वारीसाठी पीएमपीच्या अतिरिक्त बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 08:41 PM2018-06-30T20:41:52+5:302018-06-30T20:42:50+5:30

दरवर्षीप्रमाणे यंदाही पालखी साेहळ्यासाठी पुणे परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) अतिरिक्त बसेसची साेय उपलब्ध करुन देण्यात येणार अाहे.

PMP additional buses for wari | वारीसाठी पीएमपीच्या अतिरिक्त बसेस

वारीसाठी पीएमपीच्या अतिरिक्त बसेस

googlenewsNext

पुणे : दरवर्षीप्रमाणे यंदाही पालखी साेहळ्यासाठी पुणे परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) अतिरिक्त बसेसची साेय उपलब्ध करुन देण्यात येणार अाहे. 3 जुलै ते 7 जुलै दरम्यान शहरातील विविध स्थानकांमधून अाळंदीकडे जाण्यासाठी 110 बसेस साेडण्यात येणार अाहेत. त्यामुळे राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या वारकऱ्यांना अाळंदीला जाणे साेयिचे हाेणार अाहे. 
  
     पालखी प्रस्थानासाठी हजारो भाविक पुण्याहून आळंदीकडे प्रवास करतात. त्यांना वेळेत बस उपलब्ध करून देण्यासाठी पीएमपीएल प्रशासनाने दरवर्षीप्रमाणे २० अतिरिक्त बसचे नियोजन केले आहे. तसेच प्रस्थानाआधी ६ जुलैला रात्री बारा वाजेपर्यंत बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. तर श्री क्षेत्र देहूकडे जाण्यासाठी पुणे स्टेशन, महानगरपालिका,  निगडी ठिकाणावरून संचलनात असणार्‍या २० बसेस महामंडळाकडून देण्यात आल्या आहेत. याशिवाय देहू ते आळंदी अशा १९ बसेस उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. या व्यतिरिक्त नेहमीच्या संचलनात असणर्‍या बसेस सकाळी साडेपाच वाजल्यापासून पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील भाविकांसाठी  सुरु हाेणार आहेत. तसेच पुण्याहून पंढरीच्या दिशेने पालखी निघताना ९ जुलैला  हडपसरमध्ये पालख्या दर्शनासाठी दुपारी थांबणार असल्याने, या वेळेस महात्मा गांधी स्थानकाजवळ पुणे स्टेशन, वारजे माळवाडी, कोथरुड डेपो, निगडी, आळंदी  ठिकाणी जाण्यासाठी बससेवेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. 

    दोन्ही पालखी प्रस्थान सोहळा सोलापूर व सासवड रस्त्याने मार्गस्थ होणार असल्याने  सोलापूर-उरुळीकांचन मार्ग जसजसा वाहतुकीसाठी खुला होईल, तशी बसवाहतुक सुरु ठेवण्यात येणार आहे. हडपसर ते सासवड दरम्याचा दिवेघाट रस्ता वाहतुकीस पुर्णतः बंद राहणार आहे. दरम्यान, प्रवासी भाविकांच्या वाहतुकीच्या सोईसाठी या मार्गाची बसवाहतूक दिवेघाट ऐवजी बोपदेव घाटमार्गे अशी सुरु ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी बसेसचे संचलन स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर असे राहणार असून, ६० जादा बसेसचे नियोजन करण्यात आल्याची माहिती पीएमपीएल प्रशासनाने दिली आहे.
 

Web Title: PMP additional buses for wari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.