प्लास्टिक कच-यापासून रस्ते , जर्मनीहून तंत्रज्ञान आणणार - गिरीश बापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 03:46 AM2018-01-30T03:46:24+5:302018-01-30T03:47:07+5:30

प्लास्टिक कच-यापासून रस्ते बनविण्याचे तंत्र आम्ही जर्मनीवरून आयात करीत असून, त्याचबरोबर कचरा वर्गीकरणासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करून शहर कचरामुक्त करणार आहोत, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले.

 Plastic waste - from the roads, Germany to bring technology - Girish Bapat | प्लास्टिक कच-यापासून रस्ते , जर्मनीहून तंत्रज्ञान आणणार - गिरीश बापट

प्लास्टिक कच-यापासून रस्ते , जर्मनीहून तंत्रज्ञान आणणार - गिरीश बापट

googlenewsNext

बाणेर : पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही पुण्यात चारही दिशेने मेट्रोचे जाळे बनविण्याचे काम सुरू केले आहे. तसेच पुणे शहरातील बाहेरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी रिंगरोडचे काम मार्गी लावत आहोत. प्लास्टिक कच-यापासून रस्ते बनविण्याचे तंत्र आम्ही जर्मनीवरून आयात करीत असून, त्याचबरोबर कचरा वर्गीकरणासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करून शहर कचरामुक्त करणार आहोत, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले.
नगरसेविका अर्चना मधुकर मुसळे यांच्या स्थानिक विकास निधीतून औंधगावातील २.२५ कोटी रुपये किमतीचे रस्ते खोदून सर्व लाईन्स टाकून काँक्रिटीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन बापट यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी नगरसेविका अर्चना मुसळे, शिवाजीनगर भाजपा अध्यक्ष सतीश बहिरट, शहर चिटणीस रवींद्र साळेगावकर, मल्हारी गायकवाड, भाजयुमो उपाध्यक्ष रोहन कुंभार, मयूर मुंढे, अनिल भिसे, वसंतराव जुनवने, परशुराम रानवडे, प्रसाद श्रीखंडे, डॉ. मनोहर शेट्टीवर, हिरामण ठोंबरे, विनय शामराज, सुरेश चोंधे, अमोल कांबळे, किशोर वाघमारे, स्वामी नवले, भास्कर जमदग्नी, योगेश गोळे, रमेश कडुसकर, शंकर चोंधे, भास्कर नाईक, विलास कुलकर्णी, सुधाकर आडागळे, धनंजय चोंधे, प्रमिला वसंत झुरंगे, गुरमित सिंघ, शरद कलापुरे उपस्थित होते.

औंध गावात गेली २५ वर्षांपासून रस्त्यावर डांबराचे थरावर थर चढविल्यामुळे घरासमोरील उंच ओटे रस्त्याखाली गेले आहेत. पावसाळ्यात रस्त्यावरील पाणी घरामध्ये घुसत आहे. त्यामुळे आम्ही पहिल्या टप्प्यात प्रमुख रस्ते खोदून सर्व लाईन्स टाकून काँक्रिटीकरण करणार आहोत. स्मार्ट सिटी अंतर्गत औंध भाग विकसित करीत असताना विकासकामे करून औंधगावही आम्ही स्मार्ट करणार आहोत.
- अ‍ॅड. मधुकर मुसळे
 

Web Title:  Plastic waste - from the roads, Germany to bring technology - Girish Bapat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.