उपनगराध्यक्षांच्या नावे फोन करून गंडा, लाटले सव्वादोन लाख रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 01:36 AM2017-12-30T01:36:35+5:302017-12-30T01:36:38+5:30

लोणावळ्याचे उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी बोलतो आहे, असे फोन करून सांगत एका व्यावसायिकाला तब्बल दोन लाख ३० हजार रुपयांना गंडा घालण्याचा प्रताप अज्ञात इसमाने केला आहे.

Phone by name in favor of sub-head | उपनगराध्यक्षांच्या नावे फोन करून गंडा, लाटले सव्वादोन लाख रुपये

उपनगराध्यक्षांच्या नावे फोन करून गंडा, लाटले सव्वादोन लाख रुपये

Next

लोणावळा : लोणावळ्याचे उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी बोलतो आहे, असे फोन करून सांगत एका व्यावसायिकाला तब्बल दोन लाख ३० हजार रुपयांना गंडा घालण्याचा प्रताप अज्ञात इसमाने केला आहे. याप्रकरणी सचिन अभयकुमार राठोड यांनी शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दिली आहे.
राठोड यांचे लोणावळा बाजारपेठेत विद्युत उपकरणांचे दुकान आहे. त्यांना २१ डिसेंबर रोजी दुपारी बाराच्या सुमारास फोन आला. त्या वेळी समोरच्या व्यक्तीने त्यांचे नाव उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी असल्याचे सांगत, मला माझ्या कामशेत येथील साइटच्या ओपनिंगकरिता सॅमसंग कंपनीचे ४३ इंची चार व ३२ इंची दोन टीव्ही संच व दोन मायक्रोवेव्ह हवे असल्याचे सांगत त्याची किंमत मला चेक करुन माझा मोबाइलवर पाठवा असे सांगितले.
दरम्यान, अर्ध्या तासाने पुन्हा फोन आला व सदर माल घेण्यासाठी मी गाडी पाठवत आहे. मालाचे पैसे रात्री आठ वाजता देतो असे सांगितले. उपनगराध्यक्षांचा फोन असल्याने त्यावर विश्वास ठेवत राठोड यांनी उपलब्ध असलेला निम्मा माल टेम्पोमध्ये (एमएच १४ एझेड २२२६) भरला. मात्र, तो माल कार्ला फाटा येथेच उतरवून घेण्यात आला. सकाळी पुन्हा फोन आल्याने तो माल टेम्पोत पाठविण्यात आला.

Web Title: Phone by name in favor of sub-head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.