पेट्रोलियम कंपन्या करणार बायोगॅसचे उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2018 02:33 AM2018-12-09T02:33:53+5:302018-12-09T02:34:15+5:30

कचऱ्यातून होणार इंधननिर्मिती; वर्षाला १५ दशलक्ष टन उत्पादनाचे उद्दिष्ट

Petroleum companies will produce biogas production | पेट्रोलियम कंपन्या करणार बायोगॅसचे उत्पादन

पेट्रोलियम कंपन्या करणार बायोगॅसचे उत्पादन

Next

पुणे : अपारंपरिक ऊर्जास्रोताचा वापर वाढावा यासाठी देशातील आॅईल कंपन्यांनी ‘सतत’ अभियान हाती घेतले असून, त्या अंतर्गत बायोगॅस निर्मितीला प्राधान्य देण्यात येणार आहे. देशात २०२३पर्यंत ५ हजार कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्यातून वर्षाला १५ दशलक्ष टन जैव इंधनाच्या उत्पादनाचा संकल्प असल्याचे कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले.

इंडियन आॅइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कार्पोरेशन आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन या कंपन्यांच्या वतीने वाहतुकीच्या शाश्वत पर्यायासाठी शनिवारी रॅली काढली. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे संचालक विजय शर्मा यांच्या हस्ते रॅलीला हिरवा कंदील दाखविण्यात आला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात पर्यायी ऊर्जाचे कार्यकारी संचालक सुबोधकुमार, इंडियन फाउंडेशन फॉर ग्रीन एनर्जीचे अध्यक्ष प्रमोद चौधरी, मुरली श्रीनिवासन आणि दिलीप पटनाईक या वेळी उपस्थित होते.

‘सतत’या मोहिमेद्वारे शेतामध्ये उरलेल्या कच्च्या घटकांचा वापर, गायीचे शेण व नगरपालिकांच्या घनकचºयाचा वापर इंधननिर्मितीसाठी केला जाणार आहे. त्या माध्यमातून शेतकºयांना उत्पन्नाचे नवे साधन उपलब्ध होईल. ‘सतत’ अभियानांतर्गत, आॅइल मार्केटिंग कंपन्या आॅटोमोटिव्ह क्षेत्रासाठी आवश्यक इंधन देण्याची क्षमता बाळगणाºया उद्योजकांकडून कॉम्पे्रस्ड बायोगॅस (जैविक इंधन) उपलब्ध करून देण्याबाबतचा त्यांचा कल जाणून घेतला जाईल. अर्ज करण्यासाठी ओएमसीजीच्या संकेतस्थळाला मार्च २०१९ पर्यंत भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

वाहतूक क्षेत्रात सीबीजीचा (कॉम्प्रेस्ड बायोगॅस) वापर केल्यास, त्याचा कचरा व्यवस्थापनाला उपयोग होईल. तसेच, त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी येईल. देशात असणाºया सर्व साधनांचा सीबीजी निर्मितीसाठी वापर करण्यात आपण यशस्वी झालो तर, वर्षाला आपल्याला ६२ दशलक्ष टनांपर्यंत सीबीजी उपलब्ध होईल. त्यातून देशातील गॅस मागणीला सर्वोत्तम पर्याय उपलब्ध होईल. त्या माध्यमातून इंधनावरील परदेशी अवलंबित्वदेखील कमी होईल.
- विजय शर्मा, नैसर्गिक वायू मंत्रालयाचे संचालक

Web Title: Petroleum companies will produce biogas production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे