देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 09:27 PM2018-09-20T21:27:38+5:302018-09-20T21:28:52+5:30

गणशाेत्सवाचा अाठव्या दिवशी नागरिकांनी शहरातील देखावे पाहण्यासाठी माेठी गर्दी केली हाेती.

people step out to see decorations | देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

googlenewsNext

पुणे : गणशाेत्सवाचा अाठव्या दिवशी नागरिकांनी शहरातील देखावे पाहण्यासाठी माेठी गर्दी केली हाेती. संध्याकाळी पाच नंतर गर्दीने शिवाजी रस्ता फुलून गेला. बाल गाेपाळांसह ज्येष्ठांपर्यंत सगळेच देखावे पाहण्यासाठी शहरात अाले हाेते. पाेलिसांचाही माेठा बंदाेबस्त तैनात करण्यात अाला हाेता. 

    पुण्यात गणेशाेत्सव माेठ्या उत्साहात साजरा केला जाताे. शहराच्या उपनगरांबराेबरच राज्याच्या विविध भागांमधून नागरिक गणेशाेत्सवासाठी शहरात येत असतात. गणेश विसर्जनाला अाता काहीच दिवस राहिल्याने नागरिक देखावे पाहण्यासाठी गर्दी करत अाहेत. यंदा अनेक मंडळांनी दक्षिण भारतातील मंदिरांच्या प्रतिकृती साकारल्या अाहेत. तर काही मंडळांनी जीवंत देखाव्यांवर भर दिला अाहे. डिजेला सरकारने बंदी घातली असल्याने नागरिकांना शांततेत गणेशाेत्सवाचा अानंद घेता येत अाहे. शहरातील मानाच्या पाच गणपतींना माेठा इतिहास असल्याने या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी नागरिक गर्दी करत अाहेत. मंडळांनी भाविकांसाठी चाेख व्यवस्था केली अाहे. भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता येईल याची साेय मंडळांनी केली अाहे. 

    उपनगरांमधील देखावे पाहण्यासाठी सुद्धा नागरिक माेठ्या प्रमाणावर बाहेर पडले हाेते. जंगली महाराज रस्त्यावर अनेक ठिकाणी जीवंत देखावे सादर करण्यात अाले अाहेत. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत अाहे. नागरिकांना व्यवस्थित दर्शन घेता यावे यासाठी शहरातील अनेक रस्ते वाहतूकीसाठी बंद करण्यात अाले अाहेत. अनेक मंडळांकडून महाप्रसादाचे अायाेजन सुद्धा करण्यात अाले हाेते. अनंतचतुर्दशीला काहीच दिवस राहिल्याने येत्या दाेन दिवसात नागरिकांची गर्दी वाढण्याची शक्यता अाहे.

Web Title: people step out to see decorations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.