हमीपत्र घेऊनच पदनाम प्रकरणातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतन : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 11:49 AM2019-02-05T11:49:39+5:302019-02-05T11:55:42+5:30

राज्यातील ६ विद्यापीठांमधील अडीच हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाची मान्यता न घेता परस्पर पदनाम बदलून वेतनश्रेणीमध्ये मोठी वाढ करून घेतली होती.

payment given after gurantee letter to Employees in Designation fraud Case | हमीपत्र घेऊनच पदनाम प्रकरणातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतन : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

हमीपत्र घेऊनच पदनाम प्रकरणातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतन : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Next
ठळक मुद्देव्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णयराज्य शासनाने मूळ पदांवर पाठविण्याचे तसेच त्यांच्या वेतनाची वसुली करण्याचे दिले आदेशशासनाकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांचे डिसेंबर महिन्यांपासून सुधारीत वेतन अदा केले जाणे अपेक्षित

पुणे : सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठातील पदनाम प्रकरणातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सुधारीत वेतन निश्चित झाल्यानंतर जादा घेतलेली रक्कम परत करायची याबाबत हमीपत्र लिहून घेऊन त्यांना वेतन अदा करण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला. 
राज्यातील ६ विद्यापीठांमधील अडीच हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाची मान्यता न घेता परस्पर पदनाम बदलून वेतनश्रेणीमध्ये मोठी वाढ करून घेतली होती. ही वेतनवाढ थांबवून त्यांना पुन्हा मूळ पदांवर पाठविण्याचे तसेच त्यांच्या वेतनाची वसुली करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. वित्त विभागातील अधिकाऱ्यांच्या समितीमार्फत त्यानुसार त्यांच्या वेतनाची फेरनिश्चिती केली जात आहे. मात्र त्यास वेळ लागत असल्याने या कर्मचाऱ्यांचे वेतन कसे करायचे असा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत निर्णय घेण्यासाठी सोमवारी व्यवस्थापन परिषदेची बैठक बोलावण्यात आली होती.  
पदनाम गैरव्यवहारामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन होण्यास केवळ एक दिवसांचा उशीर झाला तरी त्यांनी लगेच काम बंद आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने त्यांना तातडीने अ‍ॅडव्हान्स पगाराची रक्कम जमा केली होती. राज्य शासनाच्या परिपत्रकामधील मुदद क्रमांक ६ नुसार या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी असे शासनाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार वेतनात कपात करण्याच्या निर्णयाची मात्र तातडीने अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. मात्र समितीकडून अद्याप वेतनाची फेररचना झाली नसल्याने त्याची अंमलबजावणी करण्यात अडथळे येत आहे.  
विद्यापीठ प्रशासनाकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांचे डिसेंबर महिन्यांपासून सुधारीत वेतन अदा केले जाणे अपेक्षित आहे. त्यामुळे कर्मचाºयांना वेतननिश्चिती झाल्यानंतर त्यानुसार जादा अदा झालेली रक्कम परत करावी लागेल.
...................
पदनाम प्रकरणी राज्य शासनाने काढलेल्या परिपत्रकामधील मुदद क्रमांक ६ नुसार या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी निर्देश शासनाने दिले आहेत. त्यानुसार वेतनात कपात करण्याची अंमलबजावणी त्वरीत होणे आवश्यक आहे. त्यामुळे यासाठी नेमण्यात आलेल्या समितीकडून वेतनाची फेरनिश्चिती कधी होणार याकडे सगळयांचे लक्ष लागले आहे.
...............................
या अटीवर वेतन दिले जाणार
पदनाम बदल प्रकरणात सहभाग नसलेल्या कर्मचाऱ्यांना पूर्ववत वेतन दिले जाईल. पदनाम बदललेल्या कर्मचाºयांकडून मात्र लेखी हमी पत्र घेण्यात येणार आहे. त्यानुसार सुधारित वेतनश्रेणी निश्चित झाल्यांनतर त्यातील फरकाची विद्यापीठाला परत करावी लागेल या अटीवर वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठसमितीकडून कधी होणार वेतनाची फेरनिश्चिती

Web Title: payment given after gurantee letter to Employees in Designation fraud Case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.