एसटी स्थानकात प्रवासी गाड्या, प्रवाशांची पिळवणूक सुरूच, रेस्ट रूम बंद केल्याने चालक-वाहक रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 03:37 AM2017-10-19T03:37:14+5:302017-10-19T03:37:31+5:30

राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचा-यांच्या संपाच्या दुस-या दिवशी खासगी वाहनांना प्रादेशिक वाहन कार्यालयाने परवानगी दिल्यामुळे खासगी वाहतूकदारांनी थेट बसस्थानकातच आपल्या बस उभ्या करून

 Passenger trains in the ST station, committing mischief of passengers, shutting down of rest rooms, on driver-carrier road | एसटी स्थानकात प्रवासी गाड्या, प्रवाशांची पिळवणूक सुरूच, रेस्ट रूम बंद केल्याने चालक-वाहक रस्त्यावर

एसटी स्थानकात प्रवासी गाड्या, प्रवाशांची पिळवणूक सुरूच, रेस्ट रूम बंद केल्याने चालक-वाहक रस्त्यावर

Next

पुणे : राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचा-यांच्या संपाच्या दुस-या दिवशी खासगी वाहनांना प्रादेशिक वाहन कार्यालयाने परवानगी दिल्यामुळे खासगी वाहतूकदारांनी थेट बसस्थानकातच आपल्या बस उभ्या करून प्रवाशांकडून पिळवणूक करून अव्वाच्या सव्वा भाडे आकारण्यास सुरुवात केली़ लगेजचे दर वेगळे द्यावे लागत आहे.
एसटीचा संप सुरू झाल्यावर स्थानकाबाहेर गल्लीबोळात गाड्या उभ्या करून मंगळवारी खासगी बसचालकांनी प्रवासी गोळा केले होते़ प्रवाशांची गर्दी पाहून आणि मागणी पाहून जास्तीत जास्त भाडे आकारले जात होते़ प्रवाशांचे होणारे हाल लक्षात घेऊन शासनाने खासगी व्यावसायिकांना बुधवारी सकाळपासूनच थेट बसस्थानकातच गाड्या उभ्या करण्यास सुरुवात केली़ तेथेच ते ओरडून गाड्यांकडे प्रवाशांना बोलवत होते़
एरवी कोल्हापूर, सातारा, सोलापूरला जाण्यासाठी जे भाडे आकारले जाते, त्याच्या जवळपास दुप्पट भाडे घेतले जात होते़ काही एजंट तर प्रवाशांना गाडी मिळवून देतो, असे सांगून जादा १०० रुपये उकळत होते़ त्यावरून वादावादी सुरू झाल्यावर राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाºयांनी मध्यस्थी करून बसस्थानकातून तुम्ही प्रवाशांना घेत आहात़ तेव्हा एसटीच्या भावामध्ये वाहतूक करण्यास सांगितले़
तरीही जादा दर आकारला जात होता़ बारामतीसाठी ३५० रुपये घेतले जात होते़ संपाच्या धर्तीवर मिळालेल्या परवानगीमुळे एसटी फलाटावर एसटीच्या जागी खासगी वाहने दिसत होती़ त्यामुळे एजंट लोकांचा सुळसुळाटही दिसत होता. या संपामुळे सामान्य प्रवाशांचे
अतोनात हाल होत असून, यामध्ये आम्हाला वेठीस धरले जात आहे, अशी सामान्य प्रवाशांनी भावना व्यक्त केली.

प्रवाशांचा पाठिंबा नसल्याने चालक-वाहक चिंतेत

तुटपुंजा पगार मिळत असल्याने शेवटचे पाऊल म्हणून हा संप केला असला तरी वर्षातून एकदा गावी जाणाºया नोकरदारांना त्याचा मोठा फटका बसला़ त्यामुळे प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया शहरातील बसस्थानकावर पाहायला मिळत होत्या़
खासगी गाड्या या काही ठराविक मोठ्या शहरातच जातात़ त्यामुळे आडबाजूला असणा-या छोट्या गावी जाऊ इच्छिणाºया प्रवाशांना आपला प्रवास रद्द करण्याची पाळी आली़
प्रवाशांच्या या प्रतिक्रियेमुळे एसटीचे चालक, वाहकही चिंतेत पडले होते़ दिवाळीत संप करण्याऐवजी आता तात्पुरती माघार घेतली असती तर चालले असते, असा एक मतप्रवाहही चालक, वाहकांमध्ये दिसून आला़

Web Title:  Passenger trains in the ST station, committing mischief of passengers, shutting down of rest rooms, on driver-carrier road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.