पापडी तलाव हरितपट्ट्याची महापालिकेकडून कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 02:57 AM2018-11-07T02:57:19+5:302018-11-07T02:57:44+5:30

विविध मोहिमा काढून दरवर्षी लाखो वृक्षांची लागवड करुन पर्यावरण रक्षणासाठी केंद्र तसेच राज्य शासन प्रयत्न करत असले तरी केवळ मद्यधुंद वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे घडणाऱ्या अपघाताला समोर ठेवून पापडी तलाव येतील रस्त्याच्या कडेला असणा-या वृक्षांची वसई विरार शहर महानगरपालीकेकडून कत्तल सुरु आहे.

Pappadi lake green belt mausoleum from municipality | पापडी तलाव हरितपट्ट्याची महापालिकेकडून कत्तल

पापडी तलाव हरितपट्ट्याची महापालिकेकडून कत्तल

Next

वसई  - विविध मोहिमा काढून दरवर्षी लाखो वृक्षांची लागवड करुन पर्यावरण रक्षणासाठी केंद्र तसेच राज्य शासन प्रयत्न करत असले तरी केवळ मद्यधुंद वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे घडणाऱ्या अपघाताला समोर ठेवून पापडी तलाव येतील रस्त्याच्या कडेला असणा-या वृक्षांची वसई विरार शहर महानगरपालीकेकडून कत्तल सुरु आहे.
याबाबत वृक्षप्रेमींमधून संताप व्यक्त केला जात असून रस्ता रु ंदीकरण तसेच विभाजनाच्या नावाखाली सुरू असलेली पर्यावरणाची हानी भविष्याची चिंता वाढवणारी ठरत आहे. विशेष म्हणजे पालिकेकडून ८ वर्षांपूर्वी पापडी रस्त्याचे रुंदीकरण करून अर्धवस्थेत सोडून देण्यात आले होते. तेथे आता गाड्यांची पार्किंग केली जात आहे.
घडणाºया अपघातात ज्यांचा काहीच संबंध नाही अश्या वृक्षांची कत्तल करण्यात येत आहे. रस्ता विभागला की अपघाताचे प्रकार थांबतील असा अजब अंदाज पालिका प्रशासनाकडून लावण्यात आला आहे. मात्र, त्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या वृक्षांची कत्तल आवश्यक आहे का? हा सवाल वृक्षप्रेमी विचारू लागले आहेत.
दारुड्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटला तर रस्ता विभाजनानंतर लावण्यात येणाºया डिव्हायडर तोडूनही अपघात होऊ शकतो. त्यामुळे वृक्षतोड करण्यापेक्षा वाहनांच्या गतीवर मर्यादा कशी लावता येईल याकडे जास्त भर असणे गरजेचे असल्याचे नागरिकाचे म्हणणे आहे.
तोडलेली झाडे कामगारांच्या मदतीने ट्रकमध्ये भरून कुठे नेली जातात याबाबत कामगारांनाही काही सांगता येत नाही. त्यामुळे तोडलेल्या झाडांचे पुढे काय होते हे समजू शकले नाही. जेवढी झाडे तोडली जातील त्या बदल्यात दुसºया ठिकाणी झाडांचे रोपण करावे, अशी मागणी पर्यावरण प्रेमींमधून होत आहे.

हा अजिब न्याय...

पापडी तलाव परिसरात आॅक्टोबर २०११ भल्यापहाटे विरुद्ध दिशेला रस्त्याच्या कडेला रिक्षासाठी उभ्या असलेल्या नागरिकांना, रिक्षा तसेच दुचाकी चालकाला मद्यधुंद अवस्थेत असलेल्या स्कॉर्पियो चालकाने उडविले होते. त्यात तीन नागरिकांचा मृत्यू झाला होता. मागील महिन्यात पुन्हा भल्यापहाटे मद्यधुंद अवस्थेत असलेल्या महिंद्रा गाडीच्या चालकाने एका रिक्षाला उडविले होते.

Web Title: Pappadi lake green belt mausoleum from municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.