पार्किंग धोरणाच्या विरोधात संघटनांची तीव्र आंदोलने 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 04:36 PM2018-03-23T16:36:44+5:302018-03-23T16:36:44+5:30

रस्त्यावर लागणाऱ्या प्रत्येक वाहनाला या धोरणानुसार शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यामुळे त्याविरोधात वातावरण निर्माण झाले आहे.

organization's rapid protests against the parking policy | पार्किंग धोरणाच्या विरोधात संघटनांची तीव्र आंदोलने 

पार्किंग धोरणाच्या विरोधात संघटनांची तीव्र आंदोलने 

googlenewsNext
ठळक मुद्देमहापौरांना प्रवेशद्वारावर ताटकळत उभे राहावे लागले. आयुक्त कुणाल कुमार यांनाही खेळण्यातील गाडी भेट

पुणे: विविध राजकीय पक्ष, संस्था आणि  संघटना यांनी एकत्र येत महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर शहरातील वाहतुक पार्किंग शुल्क आकारणी धोरणाच्या विरोधात शुक्रवारी आंदोलन केले. यावेळी सत्ताधारी भाजपाच्या निषेधार्थ घोषणाही दिल्या. सुरक्षा रक्षकांनी दोनही प्रवेशद्वार बंद केल्यामुळे पालिकेसमोरच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. आक्रमक भूमिका घेत घोषणाबाजी व निदर्शने करण्यात आले. विविध राजकीय पक्ष 
स्थायी समितीने मंजूर केलेले वाहनतळ धोरण अंतिम मान्यतेसाठी म्हणून शुक्रवारी तातडीने स्थायी समितीसमोर आणण्यात आले. रस्त्यावर लागणाऱ्या प्रत्येक वाहनाला या धोरणानुसार शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यामुळे त्याविरोधात वातावरण निर्माण झाले आहे. त्याचेच प्रत्यंतर पालिकेसमोरच्या आंदोलनात आले. संभाजी ब्रिगेड, पतितपावन, भीम छावा आदी संघटनांनी आंदोलन केले. संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते बैल जोडलेला मोठा गाडा घेऊन आले होते. काहींनी टांगा आणला होता.दोन्ही प्रवेशद्वारावर गर्दी झाली होती. घोषणांनी पालिकेचा परिसर दणाणला होता.पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी नागरिकांना ही आत जाण्यास मनाई केली.त्यांच्या उद्धट व आडमुठेपणाच्या वागण्यामुळे वाद सुरू झाला. त्याचा फटका आजी माजी महापौरांना देखील बसला. त्यांना काहीकाळ महापालिकेच्या प्रवेशद्वारावर ताटकळत उभे राहावे लागले. सभेचे कामकाज सुरू होताच शिवसेना व मनसेच्या सदस्यांनी भाजपाच्या निषेधाच्या घोषणा देत सभाग्रुहात गोंधळ केला. मनसेचे वसंत मोरे, साईनाथ बाबर डोक्यावर खेळण्यातील वाहने बांधून आले होते. शिवसेनेचे गटनेते संजय भोसले व अन्य सदस्य काळे शर्ट टोप्या परिधान करून आले होते.पुणेकरांच्या खिशावर डल्ला मारणाऱ्या भाजपाचा निषेध करणार्या घोषणा देण्यात होत्या.मनसे व शिवसेनेने मुक्ता टिळक यांना निषेध म्हणून खेळण्यातील वाहने भेट दिली. आयुक्त कुणाल कुमार यांनाही खेळण्यातील गाडी देण्यात आली.

Web Title: organization's rapid protests against the parking policy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.