पाटस येथे भरधाव लक्झरी बसची वारकऱ्यांना धडक , एक ठार, तीन जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 07:17 PM2019-07-01T19:17:41+5:302019-07-01T19:21:20+5:30

पाटस येथील बारामती फाट्याजवळ भरधाव वेगाने धावत येणाऱ्या लक्झरीने (बस क्र. एमएच ०४ जी ७५९९) वारकऱ्यांना धडक दिली.

one killed and three injured in luxury bus accident at patas | पाटस येथे भरधाव लक्झरी बसची वारकऱ्यांना धडक , एक ठार, तीन जखमी

पाटस येथे भरधाव लक्झरी बसची वारकऱ्यांना धडक , एक ठार, तीन जखमी

Next
ठळक मुद्देसंत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकरी

पाटस : पाटस येथील बारामती फाट्याजवळ भरधाव वेगाने धावत येणाऱ्या लक्झरीने (बस क्र. एमएच ०४ जी ७५९९) वारकऱ्यांना धडक दिल्याने जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील एक वारकरी ठार, तर तीन वारकरी जखमी झाल्याची माहिती पोलीस हवालदार बाळासाहेब पानसरे यांनी दिली. हा अपघात पहाटेच्या सुमारास झाला. 
नागू शिवराम लिंगे (वय ६५, रा. लासुर्णे, ता. इंदापूर) हे वारकरीभक्त या अपघातात जागीच ठार झाले. तर, जनाबाई सीताराम दुधे (वय ५०, रा.भानसगाव, उस्मानाबाद), प्रभावती वैजनाथ सुडके (वय ५५, रा. मोहा, उस्मानाबाद), शालन रमेश वीर (वय ५० रा. मोहा, उस्मानाबाद) हे तिघे जखमी झाले आहेत. त्यांना येथील खासगी रुग्णालयात उपचार करून सोडून देण्यात आले आहे.  पहाटे साडेचारच्या सुमारास वारकरीभक्त रोटी घाटाकडे निघाले होते. दरम्यान, कुरकुंभकडून येणाऱ्या लक्झरी बसने वारकऱ्यांना धडक दिल्याने हा अपघात झाला. 

Web Title: one killed and three injured in luxury bus accident at patas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.