पुणे शहरातून 'वंचित' चा पहिला खासदार म्हणून शंभर टक्के निवडून येणार - वसंत मोरे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 02:48 PM2024-04-03T14:48:19+5:302024-04-03T14:49:07+5:30

वंचित बहुजन समाजाच्या नागरिकांची वज्रमूठ बांधत प्रस्थापित पक्षांना त्यांची जागा दाखवून वंचितचा विजय १००% साकारणार

One hundred percent will be elected as the first MP of Vanchit bahujan aghadi from Pune city - Vasant More | पुणे शहरातून 'वंचित' चा पहिला खासदार म्हणून शंभर टक्के निवडून येणार - वसंत मोरे

पुणे शहरातून 'वंचित' चा पहिला खासदार म्हणून शंभर टक्के निवडून येणार - वसंत मोरे

लष्कर : बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी पक्षाने दिलेल्या उमेदवारीच्या माध्यमातून पुणे शहरातून वंचित चा पहिला खासदार म्हणून शंभर टक्के निवडून येण्याचा विश्वास वंचित बहुजन आघाडी पक्षाचे पुणे लोकसभेचे उमेदवार वसंत मोरे यांनी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला. काल रात्री लोकसभेचे उमेदवार म्हणून जाहीर झाल्यानंतर ते आज जिल्हाधिकारी कार्यालय येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी आले होते. यावेळी ते बोलत होते. 

काल राज्यातील वंचित च्या पाच उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर त्यात पुण्याच्या जागेसाठी पुणे शहरातील मनसे चे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांचे आले या पार्श्वभूमीवर वंचित पुणे शहराच्या वतीने सर्व कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उमेदवार  वसंत मोरे यांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होते. याप्रसंगी मोरे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांनतर वसंत मोरे यांनी पत्रकारांशी संवाद साधत विविध राजकीय, सामाजिक विषयांवर आपले प्रतिक्रिया देत आपल्या विजयाच्या विश्वास व्यक्त केला.

वंचित बहुजन समाजाच्या नागरिकांची वज्रमूठ बांधत प्रस्थापित पक्षांना त्यांची जागा दाखवून वंचित च विजय १००% साकारणार असे मोरे म्हणाले . शहरातील मराठा समाजाच्या आरक्षणापसून विविध प्रश्नांवर सुरुवातीपासूनच मी आवाज उठवला आहे. जारांगे पाटील आणि बाळासाहेब आंबेडकर यांची ही मराठा समाजाविषयी एकच भूमिका आहे. त्यामुळे मराठा समाजही मला नक्कीच मदत करेल. मनसे पक्षात असताना ही मी कधीच जातीपातीचे राजकारण केले नाही आणि भविष्यातही करणार नाही. भोंग्याच्या प्रश्नांवर तर मी शहराध्यक्षपदी सोडले. त्यावेळी सबंध राज्यातून मुस्लिम समाजाचा मिळालेला प्रतिसाद अविश्वसनीय होता. त्यामुळे यंदा मुस्लिम समाज देखील माझ्याच पाठीची उभा राहील असा विश्वासही मोरे यांनी व्यक्त केला. मनसे मध्ये केलेल्या कार्याची दखल सबंध राज्याने घेतली. सर्वच राजकीय, सामजिक कार्यकर्त्यांची रात्री अपरात्री माणुसकीच्या माध्यमांतून कामे केली ही माझी जमेची बाजू असल्याचे मोरे यांनी यावेळी सांगितले आहे.  

Web Title: One hundred percent will be elected as the first MP of Vanchit bahujan aghadi from Pune city - Vasant More

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.