भीमाशंकरच्या दरीत पडून युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 02:33 AM2018-05-09T02:33:12+5:302018-05-09T02:33:12+5:30

राजगुरुनगर येथील १७ वर्षीय प्रणव विलास पवळे याचा भीमाशंकर येथील दरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.७) सायंकाळी घडली.

one death in bhima Shankar | भीमाशंकरच्या दरीत पडून युवकाचा मृत्यू

भीमाशंकरच्या दरीत पडून युवकाचा मृत्यू

Next

दावडी : राजगुरुनगर येथील १७ वर्षीय प्रणव विलास पवळे याचा भीमाशंकर येथील दरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.७) सायंकाळी घडली.
याबाबत खेड पोलीस ठाण्यात मृत प्रणवचे चुलते कैलास पवळे (रा. रेटवडी ता खेड) यांनी फिर्याद दिली आहे. प्रणव पवळे हा त्याच्या चुलत बहिणीचा साखरपुडा झाल्यानंतर कोणालाच दिसला नाही. परिसरात त्याचा शोध घेण्यात आला. मात्र तो आढळून आली नाही. तो कोठेतरी मित्रांसोबत गेला असावा असा अंदाज केला. मात्र तो रात्री घरी आलाच नाही. रात्री १० वाजण्याच्या सुमारास भीमाशंकर येथून त्याच्या घरी फोन आला की प्रणव पवळे हा भीमाशंकर येथील वनस्पती पॉइंट येथील दरीत खाली खोल दुचाकीसह पडला आहे. त्याचे दरीत पडल्याचे फोटो एका व्यक्तीच्या व्हॉट्सअ‍ॅपवरून पाठविण्यात आले. यावरून त्याचे चुलते कैलास पवळे यांनी खेड पोलिसांना कळविले. सोमवारी (दि.८) सकाळी पोलिसांनी भीमाशंकरच्या दरीतून त्याचा मृतदेह बाहेर काढला. ही आत्महत्या आहे की घातपात याबाबत पोलिसांना संशय असून पुढील तपास सुरु आहे .

Web Title: one death in bhima Shankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.