चिमण्यांसाठी एक एकर ज्वारी राखीव, पक्ष्यांच्या रक्षणासाठी पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 01:24 AM2018-04-10T01:24:19+5:302018-04-10T01:24:19+5:30

रणगाव (ता. इंदापूर) येथील नितीन मुरलीधर महाडिक या शेतकऱ्याने परिसरातील चिमण्या दुर्मिळ होत असल्याने चारापाणी मिळत नसल्यामुळे त्यांना खाद्यान्न देण्याच्या हेतूने स्वत:च्या शेतातील एक एकर ज्वारी न काढण्याचा निर्णय घेतला आहे.

One acre reserve for sparrows, initiative for protection of birds | चिमण्यांसाठी एक एकर ज्वारी राखीव, पक्ष्यांच्या रक्षणासाठी पुढाकार

चिमण्यांसाठी एक एकर ज्वारी राखीव, पक्ष्यांच्या रक्षणासाठी पुढाकार

googlenewsNext

वालचंदनगर : रणगाव (ता. इंदापूर) येथील नितीन मुरलीधर महाडिक या शेतकऱ्याने परिसरातील चिमण्या दुर्मिळ होत असल्याने चारापाणी मिळत नसल्यामुळे त्यांना खाद्यान्न देण्याच्या हेतूने स्वत:च्या शेतातील एक एकर ज्वारी न काढण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच त्यांनी पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था केली आहे.
रणगाव (ता. इंदापूर) येथील तरुण शेतकºयाने मुक्या पक्ष्यांच्या सहवेदना जाणून घेतलेल्या आहेत. तीव्र उन्हाळ्यात चिमण्यांना अन्न-पाणी मिळत नसल्यामुळे चिमण्यांचे दु:ख लक्षात घेऊन स्वत:च्या शेतातील ज्वारी सोडून देऊन सर्वांपुढे आदर्श ठेवला आहे. नितीन महाडिक या शेतकºयांना लहानपणापासूनच पक्ष्यांविषयी प्रेम असल्याने दरवर्षी पक्ष्यांना पाण्याची सुविधा उपलब्ध करून देत असत. दरवर्षी चिमण्यांचे घटते प्रमाण व चिमण्यांची दुर्मिळता लक्षात घेऊन या वर्षी चिमण्यांना अन्न-पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. घरातील सर्वच सदस्यांनी त्यांच्या निर्णयाला अनुमती दर्शविल्यामुळे आज जवळजवळ १ एकर जमिनीवर असलेली ज्वारी राखण न करता पाखरे न हुसकावण्याचा निर्णय घेतल्याने हजारो चिमण्या या ज्वारीवर ताव मारून पाणी पिऊन भुर्रर्रर्र उडून जाताना दिसत आहेत.
परिसरातील पशू-पक्ष्यांकडे माणसाने स्वत:च काळजीपूर्वक लक्ष दिल्यास दुर्लक्षित होणारे पक्षी पुन्हा आपल्याला थव्याथव्याने पाहावयास मिळतील.
प्रत्येकाने जमेल तेवढ्या प्रमाणात पाणी व चारा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केल्यास मुक्या पक्ष्यांना आधार मिळणार असल्याचे नितीन याने सांगितले.

Web Title: One acre reserve for sparrows, initiative for protection of birds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.