धर्माच्या नावाने भिंत नको, सेतू बांधायला हवा; संजय आवटे यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 10:29 AM2023-08-31T10:29:27+5:302023-08-31T10:29:43+5:30

धर्माचा खरा अर्थ समजणे ही काळाची गरज

No wall should be built in the name of religion but a bridge should be built Commentary by Sanjay Awte | धर्माच्या नावाने भिंत नको, सेतू बांधायला हवा; संजय आवटे यांचे प्रतिपादन

धर्माच्या नावाने भिंत नको, सेतू बांधायला हवा; संजय आवटे यांचे प्रतिपादन

googlenewsNext

पुणे: ‘धर्माचा खरा अर्थ समजणे ही काळाची गरज आहे. महावीरांनी अहिंसा, अस्थेय, परिगृह असा संदेश दिला. धर्म म्हणजे धारणा; परंतु धर्माच्या नावाने भिंती बांधल्या जात असताना धर्माच्या नावाने सेतू बांधणे आणि तोडण्याचे काम चालू असताना जोडण्याचे काम महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन ‘लोकमत’चे संपादक संजय आवटे यांनी केले.

राष्ट्रसंत आचार्य भगवंत आनंदऋषीजी म. सा. यांच्या १२४ व्या जयंतीनिमित्त प. पू. चंदनबालाजी म. सा., प. पू. श्री. पद्मावतीजी म. सा. यांच्या आशीर्वादाने आनंद दरबार, दत्तनगरच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ‘लोकमत’चे संपादक संजय आवटे, दि पूना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष राजेंद्रजी बाठिया, माजी नगरसेवक युवराज बेलदरे, प्रवीण चोरबोले, स्मिता कोंढरे, गणेश महाराज भगत, युवक काँग्रेसचे महाराष्ट्र सरचिटणीस अक्षय जैन, संदीप बेलदरे, दीपक बेलदरे, देवीदास जाधव आदी उपस्थित होते. यावेळी पत्रकार रवी कोपनर, गणेश वाघमोडे, धनराज गरड यांचा सन्मान करण्यात आला.

संपादक संजय आवटे म्हणाले की, ज्यांना महावीर कळतो त्यांना अहिंसा कळते. पूर्वी थोरांची ओळख नावाचे पुस्तक असायचे, आता चोरांची ओळख आहे. आपण खूप मोठे चोर असून उद्याच्या पिढ्यांचे भवितव्य चोरण्याचे काम आपण करत आहोत. अधर्म वाढत असताना धर्माने समकालीन संदर्भात भूमिका घेणे गरजेचे आहे. त्यामुळेच आजच्या काळात पत्रकारिता करणे हे आव्हानात्मक आहे, तरीही ते आव्हान पेलून उत्तम पत्रकारिता अनेक लोक करतात, त्यांना पुरस्कार देणे ही बाब मोठी आहे.

जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महा प्रसादी श्री बन्सीलाल अनिल मनोज ओस्तवाल परिवार मिळला. स्वागत आणि कार्यक्रमाचे प्रस्ताविक आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी केले. महेश लुंकड आणि सौरभ धोका यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास आनंद दरबार ट्रस्टचे सर्व पदाधिकारी आणि महिला भगिनी उपस्थित होत्या.

पुरस्काराने जबाबदारी वाढते - आमदार तापकीर

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून प्रसारमाध्यमाकडे पाहिले जाते कारण पत्रकार नेहमीच सामान्य लोकांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवतो व त्याला न्याय मिळवून देण्यासाठी झगडतो त्यामुळे त्यांचा गौरव करणे हे सामाजिक संस्थांचे कर्तव्यच आहे. मात्र गौरव झाला, पुरस्कार मिळाला की मग पत्रकारांचीही जबाबदारी अधिक वाढते, असे प्रतिपादन खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी केले.

Web Title: No wall should be built in the name of religion but a bridge should be built Commentary by Sanjay Awte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.