आता नको इंग्रजीची भिती; पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये अद्ययावत प्रयोगशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 02:50 PM2017-11-20T14:50:57+5:302017-11-20T15:22:08+5:30

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या टिळक रोडवरील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये भाषेची अद्ययावत प्रयोगशाळा सुरू करण्यात आली. या प्रयोगशाळेचे उद्घाटन ‘लेंड-ए-हँड-इंडिया’ संस्थेच्या प्रमुख सुनंदा माने यांच्या हस्ते करण्यात आले.

No fear of English now; English laboratory at New English School in Pune | आता नको इंग्रजीची भिती; पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये अद्ययावत प्रयोगशाळा

आता नको इंग्रजीची भिती; पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये अद्ययावत प्रयोगशाळा

googlenewsNext
ठळक मुद्दे‘लेंड-ए-हँड-इंडिया’ संस्थेच्या प्रमुख सुनंदा माने यांच्या हस्ते करण्यात आले प्रयोगशाळेचे उद्घाटनप्रयोगशाळा ३० संगणक, प्रिंटर, स्कॅनर, एलईडी, प्रोजेक्टरने सुसज्जआधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संभाषण, लेखन, संवाद आणि क्रियांच्या माध्यमातून शिक्षण

पुणे : मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजीविषयी एक प्रकारची भिती असते़ त्यातूनच इंग्रजीतून संवाद साधण्यास ही मुले मागे पडतात़ त्यामुळे व्यवहारी जगामध्ये इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या मुलांच्या तुलनेत ही मुले मागे राहताना दिसत असल्याचे आजवर दिसून आले आहे़ यावर मात करण्यासाठी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या टिळक रोडवरील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये भाषेची अद्ययावत प्रयोगशाळा सुरू करण्यात आली. 
या प्रयोगशाळेचे उद्घाटन ‘लेंड-ए-हँड-इंडिया’ संस्थेच्या प्रमुख सुनंदा माने यांच्या हस्ते करण्यात आले. शाळा समितीचे अध्यक्ष डॉ. सुनील भंडगे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ही प्रयोगशाळा ३० संगणक, प्रिंटर, स्कॅनर, एलईडी, प्रोजेक्टरने सुसज्ज आहे. इंग्रजी शिकविण्यासाठी आवश्यक सॉफ्टवेअरने सुसज्ज आहे. पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ती उपलब्ध होणार आहे. आठवड्याला एका विद्याथ्यार्ला किमान एक तास सराव करता येईल असे नियोजन करण्यात आले आहे. शिक्षकांना दोन दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. 
मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेची भिती वाटते.  इंग्रजीविषयी त्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण झालेला असतो. तो कमी करण्यासाठी या प्रयोगशाळेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संभाषण, लेखन, संवाद आणि क्रियांच्या माध्यमातून सोप्या पध्दतीने इंग्रजीचे शिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती मुख्याध्यापक नागेश मोने यांनी यावेळी दिली. तीन स्तरावर हा अभ्यासक्रम शिकविण्यात येणार आहे. इंग्रजीचे शिक्षक शैलेश बर्गे यांनी या उपक्रमाचे संयोजन केले. निकिता महाजन यांनी सूत्रसंचालन केले. क्षितिज गवाणकर, स्वाती मिश्रा यांनी तंत्रज्ञानाची ओळख करून दिली.

Web Title: No fear of English now; English laboratory at New English School in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.