पुण्यातील वात्सल्य रुग्णालयातील इन्क्युबेटरमध्ये भाजल्यानं नवजात बाळाचा मृत्यू   

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 11:09 AM2017-09-27T11:09:19+5:302017-09-27T13:34:15+5:30

पुणे शहरातील वात्सल्य मॅटर्निटी होम येथे इन्क्युबेटरमध्ये भाजल्यानं नवजात बाळाचा मृत्यू झाला आहे.  तापमान प्रमाणाबाहेर वाढल्यामुळे इन्क्युबेटरनं पेट घेतला व या घटनेत हे नवजात बाळ 95 टक्के भाजलं होतं.

Newborn baby dies after being burnt to the Incubator in Pune | पुण्यातील वात्सल्य रुग्णालयातील इन्क्युबेटरमध्ये भाजल्यानं नवजात बाळाचा मृत्यू   

पुण्यातील वात्सल्य रुग्णालयातील इन्क्युबेटरमध्ये भाजल्यानं नवजात बाळाचा मृत्यू   

Next

पुणे, दि. 27 - पुणे शहरातील वात्सल्य मॅटर्निटी होम येथे इन्क्युबेटरमध्ये भाजल्यानं नवजात बाळाचा मृत्यू झाला आहे. तापमान प्रमाणाबाहेर वाढल्यामुळे इन्क्युबेटरनं पेट घेतला व या घटनेत हे नवजात बाळ 95 टक्के भाजलं. पुण्यातील बुधवार पेठेतील वात्सल्य मॅटर्निटी होममध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नेमकी काय आहे घटना ?
विजयेंद्र आणि स्वाती कदम या दाम्पत्याला मुलगी झाली. स्वाती यांचं सिझर झाल्यानंतर बाळाला श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानं बाळाला इन्क्युबेटरमध्ये ठेवण्यात आले होते. यावेळी तापमान प्रमाणाबाहेर वाढवल्यानं इन्क्युबेटरनं पेट घेतला. या घटनेत नवजात बाळ 95 टक्के भाजलं. मंगळवारी (26 सप्टेंबर ) सकाळी ही घटना घडली होती. दरम्यान, यावेळी इन्क्युबेटरनं पेट घेतल्यानंतर स्फोटासारखा आवाज येऊन मशिनमधून धूर आल्याचा दावाही कदम कुटुंबीयांनी केला आहे. शॉर्ट सर्किटमुळे इन्क्युबेटर ओव्हरहिट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.  

दरम्यान, वात्सल्य हॉस्पिटलचे गायनॅकॉलिजस्ट गौरव चोपडे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कलम 287 (मशिनरीबाबत हलगर्जी) आणि 338 (इतरांच्या जीवाला किंवा वैयक्तिक सुरक्षेला धोका पोहचवणारं विघातक कृत्य) अंतर्गत गुन्हा मंगळवारी दाखल करण्यात आला.  
 

Web Title: Newborn baby dies after being burnt to the Incubator in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.