मधुमेहावरील नव्या संशोधनाला मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 04:15 AM2017-08-07T04:15:01+5:302017-08-07T04:15:01+5:30

साखर वाढणे हे फक्त मधुमेहाचे एक लक्षण आहे, ते रोगाचे मूळ नाही. मधुमेहींमधील प्रक्रियांच्या जाळ्यात साखर केंद्रस्थानी नसून आजार बरा करण्याची गुरुकिल्ली इतरत्र आहे, असा नवा अभ्यास पुढे आला आहे.

New research on diabetes is recognized | मधुमेहावरील नव्या संशोधनाला मान्यता

मधुमेहावरील नव्या संशोधनाला मान्यता

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : साखर वाढणे हे फक्त मधुमेहाचे एक लक्षण आहे, ते रोगाचे मूळ नाही. मधुमेहींमधील प्रक्रियांच्या जाळ्यात साखर केंद्रस्थानी नसून आजार बरा करण्याची गुरुकिल्ली इतरत्र आहे, असा नवा अभ्यास पुढे आला आहे. ‘इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च’ (आयसर) या संस्थेतील शास्त्रज्ञांनी मधुमेहातील ७० हून अधिक प्रक्रियांचा परस्पर संबंध दाखवणारा संगणकीय पट तयार केला आहे. हे नवे संशोधन अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘प्लोस वन’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रकाशित झाले आहे.
गेल्या २० वर्षांच्या काळात ७० प्रकारच्या इतर रसायनांमध्ये तसेच मेंदू आणि वर्तनाच्या बारीकसारीक अंगांत बदल होत गेल्याचे सिद्ध झाले आहे. या बदलांचा परस्परांशी नेमका संबंध स्पष्ट करण्याचे काम ‘आयसर’च्या संशोधक गटाने केले आहे, अशी माहिती प्रमुख मार्गदर्शक डॉ. मिलिंद वाटवे यांनी दिली.
नव्या संशोधनासाठीच्या अभ्यासात ‘नेटवर्क मॉडेल’ या तंत्राचा वापर करण्यात आला, असे संशोधक शुभंकर कुलकर्णी यांनी सांगितले. ‘कोळ््याच्या जाळ््यातील एक धागा हलवला तरी अख्खे जाळे हलते. मानवी शरीरातील रासायनिक प्रक्रियांचे जाळेही असेच आहे.काही धागे हलवले तर हे जाळे मधुमेहाचे रूप घेते आणि इतर धागे हलवल्यास जाळे मधुमेहापासून दूर जाते. या मॉडेलने मधुमेहासंदर्भात अनेक गोष्टी अचूक दाखवल्या आहेत आणि नव्या शक्यताही सूचित केल्या तर मधुमेह पूर्णपणे बरा करणे तत्त्वत: शक्य आहे, असे डॉ. वाटवे यांनी सांगितले.

Web Title: New research on diabetes is recognized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.