टपऱ्यांना वाढीचा पूर्व भागातील नवा पॅटर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 02:02 AM2019-01-10T02:02:57+5:302019-01-10T02:03:26+5:30

किरकोळ भांडणे वाढली : पालिका प्रशासन आणि राजाश्रयामुळे अनधिकृत पथारीवाल्यांना अभय

A new pattern in the eastern part of the growth phase | टपऱ्यांना वाढीचा पूर्व भागातील नवा पॅटर्न

टपऱ्यांना वाढीचा पूर्व भागातील नवा पॅटर्न

googlenewsNext

माऊली शिंदे 

कल्याणीनगर : पूर्व पुणे भागामध्ये अनधिकृत पथारीवाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या पथारीवाल्यांची जागेवरून दररोज वादावादी आणि किरकोळ भांडणांचे प्रमाण वाढू लागले आहे. या वादावादीमुळे एकप्रकारे गुन्हेगारी वाढू लागली आहे. पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आणि राजाश्रयामुळे अनधिकृत पथारीवाल्यांना अभय मिळत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
अधिकाधिक नफा मिळविण्यासाठी कार्यकर्ते जास्तीत जास्त पथाºया लावत आहेत. पथारीवाल्यांमध्ये स्पर्धा वाढू लागली आहे. हातगाडी लावण्याआगोदर राजकीय कार्यकर्त्यांचे ना-हरकत प्रमाणपत्र घेण्याचा अलिखित नियम या भागात झाला आहे. व्यवसायातील नफ्यामधून किती हप्ता द्यावा लागणार, हा करारनामा झाल्यांनतर धंदा करू देतात. गरीब, गरजू व्यक्तींना राजाश्रयाशिवाय हातगाडीचा धंदा करता येत नाही.

का वाढल्या हातगाड्या?
पूर्व पुणे भागामध्ये येरवडा, विश्रांतवाडी, कल्याणीनगर, कोरेगाव पार्क, विमाननगर, वडगावशेरी, खराडी, चंदननगर आणि लोहगाव या भागामध्ये नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या भागात आयटी पार्क आणि सॉफ्टवेअर कंपन्याची संख्या खूप आहे. या आयटीमधील कामगार सिगारेट ओढण्यासाठी आणि खाण्यासाठी रस्त्यावरील हातगाडीवर येतात. कमी भांडवलामध्ये, जागेचे भाडे नाही. यामुळे हातगाडीवाल्यांना अधिक नफा मिळतो. यामुळे आयटी पार्क आणि सॉफ्टवेअर कंपन्यांबाहेरील हातगाड्यांची संख्या वाढली आहे.

पथारीचं अर्थकारण
यामध्ये परप्रांतीय हातगाड्यांची संख्या सर्वांत जास्त आहे. या परिसरातील दादा, भाई, किंगमेकर, आधारस्तंभ, मार्गदर्शक, माननीय कार्यकर्त्यांना अनधिकृत हातगाडीचा व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देतात. कार्यकर्ते परप्रांतीय पथारीवाल्यांना रस्त्यावर धंदा करण्यासाठी बसवतात. त्यांच्याकडून दर दिवसाला कमीत कमी दोनशे ते हजार रुपये मिळतात. एका अनधिकृत पथारीच्या मागे कार्यकत्यांना दरमहा वीस ते तीस हजार रुपये मिळतात.

असा आहे नवा पॅटर्न
अन्यथा, त्याला धमकावण्याचे किंवा इतर त्रास देण्याचे प्रकार होतात. हातगाडीचे नुकसान केले जाते. यामुळे आयटी कंपनीच्या बाहेर आणि मोक्याच्या ठिकाणी रस्त्यावर हातगाडी लावण्यासाठी किरकोळ भांडणे आणि वाद होऊ लागले आहेत. या किरकोळ वादावादीचे रूपांतर कधी तरी गंभीर भांडणामध्ये होते. यामध्ये नाहक एखादा जीव जात आहे. मात्र, तरी या अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई होत नाही. अतिक्रमण विभागातील अधिकारी ठराविक ठिकाणीच वारंवार कारवाई करतात. कारवाई कधी होणार, याची माहिती हातगाडीवाल्यांना कळते; त्यामुळे दोन ते तीन दिवस हातगाडी लावली जात नाही. अनेकदा रात्रीची हातगाडी लावली जाते. त्यांनतर पुन्हा स्थिती जैसे थे होते.

अतिक्रमणाची कारवाई करण्याना अधिकाºयांना ‘तो माझा कार्यकर्ता आहे. गरिबांवर कारवाई का करता? इतर ठिकाणी कारवाई का करत नाही?’ अशा प्रकारे बोलून किंवा धमकावून राजकीय प्रतिनिधी किंवा माननीयांकडून दबाव आणला जातो. त्यामुळे अतिक्रमण विभागाची कारवाई यशस्वी होत नाही. दर महिना कारवाईचे उदिष्ट पूर्ण करण्यासाठी नाममात्र कारवाई दाखविली जाते. या भागांमध्ये परवानाधारक पथारीवाल्यांपेक्षा अनधिकृत हातगाडीवाल्यांची संख्या जास्त झाली आहे.

Web Title: A new pattern in the eastern part of the growth phase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे