पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँँग्रेसचेच वर्चस्व? , ग्रामपंचायत निवडणुका निकाल  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 02:17 AM2017-10-18T02:17:18+5:302017-10-18T02:22:08+5:30

पुणे जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील निवडणुक लागलेल्या २२२ ग्रामपंचायतींपैकी ४९ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित १७३ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी मतदान झाले होते.

 NCP's dominance in Pune district? Election Results of Gram Panchayat |  पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँँग्रेसचेच वर्चस्व? , ग्रामपंचायत निवडणुका निकाल  

 पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँँग्रेसचेच वर्चस्व? , ग्रामपंचायत निवडणुका निकाल  

Next

पुणे : जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील निवडणुक लागलेल्या २२२ ग्रामपंचायतींपैकी ४९ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित १७३ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी मतदान झाले होते. मंगळवारी या ग्रामपंचायतींचा निकाल जाहिर करण्यात आला. यात अनेक दिग्गजांना धक्का बसला तर काहींना ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यात येश आले. आजच्या निकालावरून काही ठिकाणी अत्यंत चुरशीच्या निवडणुका झाल्या. तर काही ठिकाणी समान मते पडल्याने चिट्टीवर सरपंच निवडण्यात आले.
थेट पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढविल्या नसल्यामुळे पक्षीय बलाबल स्पष्ठ झाले नाही. मात्र जिल्ह्यात २२२ पैैकी १३६ जागा मिळवत राष्ट्रवादी नंबर एकचा पक्ष राहिल्याचा दावा जिल्हाध्यक्ष जालिंदर कामथे यांनी केला आहे. तर काँग्रेसने ७७ ठिकाणी आपले सरपंच झाल्याचे सांगत दुसºया क्रमांकावर असल्याचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी सांगितले. शिवसेनेनीही शिरूर हवेली मतदार संघात चांगली मुसंडी घेत २७ ग्रामपंचायतींवर आपलाच सरपंच झाल्याचा दावा केला आहे.

शिरूर हवेलीत शिवसेनेची घौैडदौड

शिरूर हवेली मतदार संघात शिवसेनेने चांगले यश मिळविल्याचे या मतदार संघाचे जिल्हाध्यक्ष राम गावडे यांनी सांगितले. २७ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे सरपंच निवडून आले. भाजपाबाबत असलेला रोष व राष्ट्रवादी विरोध पक्ष म्हणून कमकूवत असल्याने शिवसेनेला यश मिळाले.
या अगोदर आंबेगाव तालुक्यात २ ग्रामपंचायत ताब्यात होत्या आता ९ ताब्यात मिळाल्या आहेत. तर खेड तालुक्यात ४ ग्रामपंचायती होत्या आता १२ ताब्यात मिळाल्या आहेत. तसेच हवेली व जुन्नरमध्येही चांगले यश मिळाले आहे.

खेडमध्ये संमिश्र यश
 
राजगुरुनगर : खेड तालुक्यात झालेल्या २३ ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना व यांना संमिश्र यश मिळाले आहे. भाजपाला काही ग्रामपंचायतींमध्ये अपवाद सोडला तर फारसे यश नाही. त्यामुळे तालुक्यात उद्यापही भाजपाला पाय रोवण्यास संधी दिसत नाही.
आज दि. १७ मतमोजणी होऊन जाहीर करण्यात आले. या निवडणुकीत प्रथमच सरपंचपदाचे उमेदवार थेट जनतेतून निवडून आले. या निवडणुका पक्षीय चिन्हावर लढवल्या गेल्या नाहीत. त्यामुळे कोणत्या पक्षाच्या ताब्यात गावाची सत्ता गेली याबाबत संभ्रमाचे चित्र असले तरी निकालाचा कल पाहिल्यास अनेक ग्रामपंचायतीत राजकीय उलथापालथ झाली आहे.
तालुक्यातील बहुतांश जागांवर राष्ट्रवादी व शिवसेना समर्थकांनी विजय मिळवला आहे. भाजपाला येथे फारशी चमक दाखवता आली नाही. शिवेसेनेचा पाय इथे भक्कम आहे. राष्ट्रवादी काँॅग्रेसला शिवसेना हिच प्रमुख प्रतिस्पर्धी आहे.
तालुक्यात शिवसेनेची सत्ता असताना ग्रामपंचायत निवडणुकीत अपेक्षित असे यश मिळाले नाही. येलवाडी, येणिवे (खुर्द), मिरजेवाडी, कोरेगाव (खुर्द) साबळेवाडी, सिद्धेगव्हाण, बहिरवाडी, गारगोटवाडी या ठिकाणी शिवसेनेला यश मिळाले असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख राम गावडे यांनी सांगितले.
वाडा या प्रमुख ग्रामपंचायतीत भाजपाला मानणारे धर्मराज
परिवर्तन पॅनेल विजयी झाले आहे. वाडा गावचे नेतेपद अनेक वर्ष संभाळणाºया बाळासाहेब शेटे यांना हा धक्का आहे.

तीन भाजपाकडे
राष्ट्रवादी पक्षाला बहूळ, शेलगाव, मांजरेवाडी, आभू, आव्हाट सुंरकुडी, दौंडकरवाडी व आदी ग्रामपंचायतमध्ये यश मिळाले असल्याचा दावा तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर
यांनी केला आहे. भांबोली, अनावळे, वाडा या गावावर भाजपा समर्थकांनी वर्चस्व मिळावले आहे. अनेक ठिकाणी स्थानिक आघाड्या आहेत. मात्र सेना भाजप दोघेही या जागावर दावा सांगत आहे.

आंबेगाव तालुक्यात १२ ग्रामपंचायती राष्ट्रवादी, तर आठ शिवसेनेकडे
 
मंचर : आंबेगाव तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीत राष्ट्रवादी काँगे्रस व शिवसेना पुरस्कृत पॅनलमध्ये प्रामुख्याने लढत झाली आहे. यातील १२ ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात गेल्या असून ८ ग्रामपंचायतींत शिवसेनेचे सरपंच झाले आहेत. कळंब ग्रामपंचायतीत अपक्ष सरपंच निवडून आला आहे. घोडेगाव, रांजणी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने निर्विवाद वर्चस्व मिळविले असून लांडेवाडी, चांडोली ग्रामपंचायतीच्या सर्व जागा शिवसेनेने जिंकल्या आहेत.
आंबेगाव तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींसाठी सरासरी ७५ टक्के मतदान झाले होते. फालोदे ग्रामपंचायतीची निवडणूक झाली नाही. येथील जागा रिक्त राहिल्या आहेत.
सर्वप्रथम घोडेगाव ग्रामपंचायतीची मतमोजणी होऊन तेथे राष्ट्रवादीने एकहाती विजय मिळविला. सरपंचपद राष्ट्रवादीकडे राहिले, तसेच त्यांनी १४ जागा जिंकल्या. शिवसेनेला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. अपक्षाने एक जागा जिंकली. आंबेदरा, साल, आमोंडी, डिंभे खुर्द येथील मतमोजणी पूर्ण झाली. कळंब ग्रामपंचायतीच्या मतमोजणीत माजी सभापती वसंतराव भालेराव यांच्या पॅनलने यश मिळविले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे यांच्या गावात राष्ट्रवादीने आघाडी घेत सरपंचपदासह ५ जागा जिंकल्या. शिवसेनेला चार जागांवर समाधान मानावे लागले. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या लांडेवाडी गावातील सर्व जागा शिवसेनेने जिंकल्या. सरपंचपदी अंकुश लांडे मोठ्या मताधिक्याने निवडून आले. रांजणी येथील राष्ट्रवादीच्या पॅनलने सर्वच्या सर्व जागा जिंकत शिवसेनेच्या पॅनलला धूळ चारली. चांडोली गावात युवा सेनेचे तालुकाप्रमुख प्रवीण थोरात यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पॅनलने सर्व जागा जिंकत राष्ट्रवादीला धक्का दिला आहे. जिल्हा उपप्रमुख रवींद्र करंजखेले यांनी त्यांच्या धामणी गावचा बालेकिल्ला शाबुत ठेवला आहे. निघोटवाडी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने वर्चस्व मिळविले आहे. २१ पैकी १२ ग्रामपंचायतींत आपले सरपंच झाल्याचा दावा राष्ट्रवादीने केला, तर ९ ठिकाणी आपले सरपंच झाल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. कळंब येथे माजी सभापती वसंतराव भालेराव यांच्या नेतृत्वाखाली पॅनलने यश मिळवित सरपंचपदावर विजय मिळविला. त्यांचे ८ सदस्य निवडून आले आहेत. राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनल व शिवसेना पुरस्कृत पॅनलमध्ये प्रामुख्याने लढत झाली आहे.

राष्ट्रवादी :
घोडेगाव, निघोटवाडी, रांजणी, पारगाव तर्फे खेड, नागापूर,
साल, आहुपे, मेंगडेवाडी, आंबेदरा, तळेघर, डिंभे, गोहे.
शिवसेना :
लांडेवाडी चिंचोडी, चांडोली बुद्रुक, धामणी, नारोडी, भावडी, डिंभे, आमोंडी, गंगापूर खुर्द, चिखली.

निघोटवाडी ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी सुभाष गणपत निघोट व संदीप शंकर निघोट यांना समान मते मिळाली. चिठ्ठीमध्ये सुभाष गणपत निघोट यांचे नाव आल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.
गोहे ग्रामपंचायतीच्या सुनील भागू गाडेकर व अशोक मारुती लांघी यांना समान मते मिळाली. चिठ्ठीमध्ये सुनील भागू गाडेकर यांचे नाव आल्याने ते विजयी झाले.

तालुक्यात राष्ट्रवादी नंबर एक...
नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँगे्रस पार्टीप्रणित पॅनलला २१ ग्रामपंचायतींपैकी १४ ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे, असा दावा राष्ट्रवादीने केला आहे. त्यामध्ये रांजणी, मेंगडेवाडी, पारगाव तर्फे खेड, घोडेगाव, साल, नागापूर, डिंभा, आंबेदरा, निघोटवाडी, तळेघर, गोहे, आहुपे यांचा समावेश आहे.नारोडी, आमोंडी या ग्रामपंचायतीमध्ये नवनिर्वाचित विजयी उमेदवारांमध्ये राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी सरपंचपद मात्र दुसºया पक्षाला मिळाल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. कळंब ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये माजी सभापती वसंतराव भालेराव यांच्या स्थानिक आघाडीचा विजय झाला आहे, असे आंबेगाव तालुका युवक राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष नीलेश स्वामी थोरात यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

आंबेगाव तालुक्यातील २२ गावच्या ग्रामपंचायत निवडणुका नुकत्याच झाल्या. यापैकी ९ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला असून शिवसेनेचे ७० हून अधिक ग्रामपंचायत सदस्य विजयी झाले आहेत. आंबेगाव तालुक्यात शिवसेनेचा भगवा डौलाने फडकला. मागील ग्रामपंचायत निवडणुकीत केवळ २ ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात होत्या. मात्र यंदा मतदारांनी शिवसेनेला व विकासकामांना प्राधान्य देत अनेक ठिकाणी परिवर्तन घडवून आणले. आंबेगाव तालुक्यातील व शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्व विजयी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांना पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
- शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार

भोरला दिग्गजांचा पराभव; अनेकांनी राखले गड

भोर : तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींत अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत अनेक गावांत दिग्गजांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे, तर अनेकांनी आपले गड राखले आहेत. निकालात तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायतींवर काँग्रेस पक्षाने वर्चस्व मिळवले आहे.
तालुक्यातील १५५ पैकी ५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यातील २० ग्रामपंचायती बिनविरोध तर ३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सोमवारी सुमारे ८५ टक्के मतदान झाले होते. सरपंचपदासाठी प्रथमच थेट मतदान असल्यामुळे अनेक गावांत चुरस निर्माण झाली होती. त्यामुळे सकाळपासूनच निकाल पाहण्यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर लोकांनी एकच गर्दी केली होती.
काही

 

Web Title:  NCP's dominance in Pune district? Election Results of Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.