राष्ट्रीय महामार्ग बनला मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 06:14 PM2019-02-01T18:14:33+5:302019-02-01T18:14:47+5:30

तालुक्यातील करंजी ते मिडसांगवी दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ चे काम गेल्या तीन वर्षापासून रखडल्यामुळे महामार्गावरून प्रवास करणा-या प्रवाशांना वारंवार अपघाताला सामोरे जावे लागत आहेत

National Highway became the trap of death | राष्ट्रीय महामार्ग बनला मृत्यूचा सापळा

राष्ट्रीय महामार्ग बनला मृत्यूचा सापळा

googlenewsNext

हरिहर गर्जे
पाथर्डी : तालुक्यातील करंजी ते मिडसांगवी दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ चे काम गेल्या तीन वर्षापासून रखडल्यामुळे महामार्गावरून प्रवास करणा-या प्रवाशांना वारंवार अपघाताला सामोरे जावे लागत आहेत. या महामार्गावरील अपघातामध्ये आजपर्यत गेल्या तीन वर्षात १२० प्रवाश्यानी जीव गमवावा असून १३५ प्रवाश्याना कायमचे अपंगत्व आले आहे. तीन वर्षापासून रखडलेल्या महामार्गामुळे करंजी घाट ते मिडसांगवी दरम्यान दररोज एक अपघात होत आहे. पाथर्डी तालुक्यात महामार्गावर २०१६ मध्ये ३९ मृत्यू झाले तर ३५ जणांना अपंगत्व आले. २०१७ मध्ये ३५ मृत्यू झाले तर ४२ जणांना अपंगत्व स्वीकारावे लागले. २०१८ मध्ये ४० मृत्यू तर ६० जणांना अपंगत्व आले. तीन वर्षात ११४ जणांना जीव गमवावा लागला. तर १३७ व्यक्तींना अपंगत्व आले. शहरातून बांधण्यात येणा-या गटारीचे काम अर्धवट असल्याने सांडपाणी महामार्गावरून वाहल्याने मोठमोठे खड्डे पडून अपघातात भर पडली. तीन वर्ष उलटूनही काम अर्धवट असल्याने ५५ कि.मीच्या महामार्गावर प्रचंड धुळीचे साम्राज्य पसरून प्रवासी व नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. महामार्गाच्या लगतच्या शेतीचे नुकसान होत आहे. काम सुरु असतांना रात्रीच्या वेळी दिसेल अशी रेफलिक्टर पट्टी, फलक, खांब उभे करणे आवश्यक असताना काहीही उपाय योजना करण्यात आली नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी खड्डे न दिसल्यामुळे अपघात होत आहेत. अनेक दिवसापासून आणून टाकलेली खडी व माती यामुळे अनेक वाहने थेट खोदलेल्या खड्यात पडून अपघात होत आहेत.

रस्त्याच्या खराब कामामुळे होणा-या अपघातास मुंबई उच्च न्यायालयाच्या निवाड्याप्रमाणे राष्ट़्रीय महामार्ग अ‍ॅथोरिटी जबाबदार असल्याने त्यांच्यावर दिवाणी व फौजदारी कारवाई व्हायला पाहीजे. - अ‍ॅड.बाळासाहेब बोडखे

Web Title: National Highway became the trap of death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.