छातीवर शिवराय आणि पाठीवर शंभूराजे काेरणाऱ्या तरुणाईच्या प्रतिनिधीला उमेदवारी : डाॅ. काेल्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 02:53 PM2019-03-17T14:53:13+5:302019-03-17T14:57:08+5:30

जातीपातीच्या पलिकडे जाऊन छातीवर शिवराय आणि पाठीवर शंभूराजे काेरणाऱ्या तरुणाईच्या प्रतिनिधीला पवार साहेंबांनी उमेदवारी दिली अशा शब्दात राष्ट्रवादीचे शिरुरचे लाेकसभेचे उमेदवार अभिनेते डाॅ. अमाेल काेल्हे यांनी शरद पवार यांचे आभार मानले.

my nomination for loksabha election is nomination of youth who believe in shivaji and sambhaji maharaj | छातीवर शिवराय आणि पाठीवर शंभूराजे काेरणाऱ्या तरुणाईच्या प्रतिनिधीला उमेदवारी : डाॅ. काेल्हे

छातीवर शिवराय आणि पाठीवर शंभूराजे काेरणाऱ्या तरुणाईच्या प्रतिनिधीला उमेदवारी : डाॅ. काेल्हे

Next

पुणे : जातीपातीच्या पलिकडे जाऊन छातीवर शिवराय आणि पाठीवर शंभूराजे काेरणाऱ्या तरुणाईच्या प्रतिनिधीला पवार साहेंबांनी उमेदवारी दिली अशा शब्दात राष्ट्रवादीचे शिरुरचे लाेकसभेचे उमेदवार अभिनेते डाॅ. अमाेल काेल्हे यांनी शरद पवार यांचे आभार मानले. शिरुर मध्ये घेण्यात आलेल्या सभेत काेल्हे बाेलत हाेते. 

काेल्हे म्हणाले, 2019 ची निवडणूक ही परिवर्तनासाठी आहे. अनेकांनी माझ्या उमेदवारीवर प्रश्न उपस्थित केले. मी पवारांचे आभार मानताे की त्यांनी एक सुशिक्षीत शेतकरी कुटुंबातील तरुणाला उमेदवारी दिली. तसेच त्यांनी कै. भागाेजी सभाजी काेल्हे या बैलगाडा मालकाच्या नातवाला उमेदवारी दिली याबद्दलही त्यांचे आभार. ही उमेदवारी म्हणजे जी तरुणाई जातीपातीच्या पलिकेड जाऊन छातीवर शिवराय आणि पाठीवर शंभूराजे काेरते आणि जीवाचं नाव भंडारा ठेवते उधळला तरी येळकाेट आणि नाही उधळला तरी येळकाेट अशा तरुणाईच्या प्रतिनिधीला दिलेली उमेदवारी आहे. 

2014 आणि 2019 च्या निवडणूकीतील फरक सांगताना काेल्हे म्हणाले, 2014 च्या निवडणूकीच्या वेळी ही निवडणूक संसदीय नाही तर अध्यक्षीय निवडणूक पद्धतीने लढवली जात असल्याचा भ्रम नागरिकांना मध्ये निर्माण करण्यात आला हाेता. परंतु गेल्या पाच वर्षात लाेकांच्या लक्षात आलंय की आपली निवडणूक ही संसदीय निवडणूक आहे त्यामुळे आपण याेग्य खासदार निवडायला हवा. याबाबातचा किस्सा काेल्हेंनी सांगितला. पाणीपतला रेल्वेतून जात असताना एका सरदारजीने माेदींचा वृत्तपत्रातील फाेटाे पाहून पेपर ठेवून दिला. त्यावेळी काेल्हे यांनी काय झाले असे विचारले असता. ते म्हणाले 2014 ला चूक केली. आम्ही पंतप्रधान निवडताेय असं समजून मतदान केलं. परंतु आपली लाेकशाही संसदीय आहे त्यामुळे आता याेग्य खासदार निवडणार. 

Web Title: my nomination for loksabha election is nomination of youth who believe in shivaji and sambhaji maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.