मुठेचं पात्र की कचऱ्याचं बेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 08:15 PM2018-04-19T20:15:45+5:302018-04-19T20:15:45+5:30

सातत्याने मुठेच्या पात्रात नागरिकांकडून कचरा टाकण्यात येत असल्याने नदीपात्रात कचऱ्याची बेटे तयार झाली अाहेत. त्यामुळे नदीचे माेठ्याप्रमाणावर प्रदूषण हाेत असून नैसर्गिक अधिवास नष्ट झाला अाहे.

mutha rever became a dumping ground | मुठेचं पात्र की कचऱ्याचं बेट

मुठेचं पात्र की कचऱ्याचं बेट

Next

पुणे : एकेकाळी पुण्याची शान असलेली मुठा नदी अाता मृत अवस्थेत पाहायला मिळत असून मुठेच्या पात्रात सातत्याने टाकण्यात येत असलेल्या कचऱ्यामुळे मुठेच्या पात्राचे कचऱ्याच्या बेटात रुपांतर झाल्याचे चित्र अाहे. त्यामुळे प्रशासन मुठेला तिचे मूळ स्वरुप प्राप्त करुन देण्यासाठी पाऊले उचलणार का असाच प्रश्न पुणेकर उपस्थित करीत अाहेत. 
    गेल्या अनेक वर्षांपासून पुण्याची मुठा नदी मृतावस्थेत असल्याचे पाहायला मिळत अाहे. पावसाळ्यांच्या दिवसात हि नदी फक्त वाहताना दिसते इतर वेळी मात्र ही नदी अाहे की सांडपाण्याचे डबके असाच काहीसा प्रश्न पडत असताे. नागरिकांकडून सातत्याने नदी पात्रात टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे नदीच्या पात्रात ठिकठिकाणी कचऱ्याची बेटे तयार झाली अाहेत. त्याचबराेबर सांडपाणी सुद्धा नदीपात्रातच साेडण्यात येत असल्याने नदीच्या पाण्याला घाणेरडा वास येत असताे. त्यामुळे नदीकिणाऱ्यावरुन चालताना नाकाला रुमाल बांधावा लागत अाहे. राज्य सरकारने प्लॅस्टिक बंदी केली असली तरी नदीच्या पात्रात माेठ्याप्रमाणावर प्लॅस्टिकच्या वस्तू टाकण्यात अालेल्या पाहायला मिळत अाहे. पालिकेकडून वेळाेवेळी निर्माल्य हे जागाेजागी ठेवण्यात अालेल्या निर्माल्य कलशात टाकण्याचे अावाहन केलेले असताना नागरिकांकडून नदीपात्रातच निर्माल्य टाकण्यात येत अाहे. 
    सातत्याने टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे, तसेच नदीत साेडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे नदीतील नैसर्गिक अधिवास नष्ट झाला अाहे. त्यामुळे जलचरांचे अस्तित्व धाेक्यात अाले अाहे. नदीच्या सद्यस्तिथीबाबत पर्यावरण प्रेमी चिंता व्यक्त करीत अाहेत. याबाबत बाेलताना पर्यावरणाचे अभ्यासक अभिजित घाेरपडे म्हणाले, कचऱ्याची याेग्य विल्हेवाट लावण्याची कुठलिही शिस्त अापल्याकडे नाही. कचऱ्याची याेग्य विल्हेवाट लावणारी यंत्रणा जरी असली तरी ती यंत्रणा पाळली जात नाही.  ज्या ठिकाणी कचरा निर्माण हाेताे, त्याच ठिकाणी त्याचे वर्गीकरण करुन त्याची याेग्य विल्हेवाट लावणे अावश्यक अाहे. लाेकांकडून कचरा कुठेही फेकला जात असल्याने ताे शेवटी नदीलाच येऊन मिळत असल्याचे चित्र अाहे. त्याचबराेबर नागरिकांकडून अनेकदा निर्माल्य सुद्धा नदीत टाकले जाते. त्यातही सध्या हे निर्माल्य प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून टाकले जात असल्याने नदीचे रुप विद्रुप हाेत अाहे. या अनुशंगाने शासनाने घेतलेला प्लॅस्टिक बंदीचा निर्णय याेग्य असला तरी त्याची काटेकाेर अंमलबजावणी करणे अावश्यक अाहे. 

Web Title: mutha rever became a dumping ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.