आरक्षणासाठी मुस्लीम समाजाचा पुण्यात ९ सप्टेंबरला मूक महामोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 05:37 AM2018-08-07T05:37:27+5:302018-08-07T05:37:31+5:30

मुस्लीम समाजाला यापूर्वी जे आरक्षण होते ते काढून घेण्यात आले. समाजातील युवक बेरोजगार आहेत.

The Muslim community for the reservation was held on September 9 at the Mouk Mahamarcha | आरक्षणासाठी मुस्लीम समाजाचा पुण्यात ९ सप्टेंबरला मूक महामोर्चा

आरक्षणासाठी मुस्लीम समाजाचा पुण्यात ९ सप्टेंबरला मूक महामोर्चा

googlenewsNext

पुणे : मुस्लीम समाजाला यापूर्वी जे आरक्षण होते ते काढून घेण्यात आले. समाजातील युवक बेरोजगार आहेत. असुरक्षितता वाढत असून सतत धोकादायक परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे यापुढील काळात मुस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षण द्यावे, याकरिता ९ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर
मूक महामोर्चा काढण्यात येणार आहे.
मुस्लीम मूक महामोर्चा समन्वय समितीने सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मोर्चात राज्यभरातून सुमारे पाच लाख मुस्लीम बांधव सहभागी होणार आहेत. ५ हजार स्वयंसेवक मोर्चात कार्यरत राहतील. कुठल्याही घोषणा न देता शांततेच्या मार्गाने मोर्चा होईल, असेही या वेळी सांगण्यात आले.
आरक्षणाशिवाय देशभरात मॉबलिंचिंगच्या घटनांमध्ये मुस्लीम समाजाच्या ७८ पेक्षा जास्त लोकांचे खून करण्यात आले. त्यातील आरोपींना फाशी द्यावी, मुस्लीम पर्सनल कायद्यामध्ये सरकारने हस्तक्षेप करू नये, वक्फ बोर्डाच्या जमिनीवरील सर्व प्रकारचे अतिक्रमण दूर करावे, समाजाला अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण देण्यात यावे, आदी प्रमुख मागण्या आहेत.

Web Title: The Muslim community for the reservation was held on September 9 at the Mouk Mahamarcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.