बेकायदा बांधकामांची बजबजपुरी, कोर्टाच्या स्टेचा आधार घेत नियमापेक्षा जास्त बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 02:48 AM2018-07-12T02:48:18+5:302018-07-12T02:48:33+5:30

अप्पर व्हीआयटी चौक ते आईमाता मंदिर पुणे स्टेशनपासून कात्रज-कोंढवा रत्याला जोडणार हा ८० फुटी समांतर रस्ता आहे.

 More construction of illegal constructions, more construction than the rules of court | बेकायदा बांधकामांची बजबजपुरी, कोर्टाच्या स्टेचा आधार घेत नियमापेक्षा जास्त बांधकाम

बेकायदा बांधकामांची बजबजपुरी, कोर्टाच्या स्टेचा आधार घेत नियमापेक्षा जास्त बांधकाम

Next

कात्रज  - अप्पर व्हीआयटी चौक ते आईमाता मंदिर पुणे स्टेशनपासून कात्रज-कोंढवा रत्याला जोडणार हा ८० फुटी समांतर रस्ता आहे. आईमाता मंदिरापासून व्हीआयटी चौकापर्यंत हा रस्ता अतिक्रमणामुळे फक्त २० फूट शिल्लक राहिला आहे.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने उभारण्यात आलेले मंगल कार्यालयाचे पार्किंग व गोडाऊन यामुळे या रस्त्याला वाहतूककोंडीचे ग्रहण लागले आहे. अनेक निष्पापांचे बळीदेखील या रस्त्याने घेतलेले आहेत.
महापालिकेचा बांधकाम विभाग व अतिक्रमण विभाग यांच्यातील एकाही अधिकाऱ्यामध्ये हे धाडस नाही, की ते या प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमणे काढून टाकतील व आपले कर्त्यव्य प्रमाणिकपणे बजावतील. या प्रत्येक अतिक्रमणात राजकीय नेते व अधिकारी यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. म्हणूनच रस्त्यावरील एकाही मंगल कार्यालय किंवा गोडाऊनवर कारवाई करून रस्ता मोकाळा करून दाखविण्याचे धाडस पालिकेचे अधिकारी दाखवत नाहीत, हे या भागातील वास्तव आहे.
अनेक गोडाऊनवाले स्वत:हून आपली रोडमध्ये जाणारी जागा ताब्यात देण्यास तयार आहेत. मात्र, पालिका अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळे या भागातील नागरिकांना त्रास होत आहे. हा भाग हिलटॉप-हिलस्लोप आहे; त्यामुळे कुठल्याही बांधकामाला येथे परवानगी
नाही.
परंतु, राजरोसपणे या भागात गोडाऊनची कामे सुरू आहेत. आतील गोडाऊनवर कारवाईचा बडगा पालिका नेहमी उगारत
असते; मात्र रोडवरच्या गोडाऊनला अभय का? असा प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

मुख्य रस्त्यावर अनधिकृत बांधकामे, गोडाऊन यांना वरदहस्त

कोर्टातील स्टेवर आयुक्तांनी लक्ष द्यावे. या भागातील अनेक गोडाऊनवाल्यांनी कोर्टात जाऊन अतिक्रमण पाडू नये, यासाठी स्टेचा आधार घेतलेला आहे. कोर्टाचा स्टे असल्यामुळे अतिक्रमण विभागाला कारवाई करता येत नाही. मात्र, हा गोडाऊन उभारलेला भाग हिलटॉप-हिलस्लोप आहे. या कायद्याप्रमाणे या भागात फक्त १ हजार फुटांच्या भूखंडावर फक्त ४० फूट बांधकाम करता येते, तेही प्लॅन पास केल्यावर. यामुळे पहिल्याच तारखेला रस्त्यावरील अनधिकृत गोडाऊन बांधकामांचा स्टे उठणे अपेक्षित आहे.

मात्र, तसे होत नाही. तारीख पे तारीख पुढे चालू आहे. स्टेच्या विरोधात पालिकेने पूर्ण ताकदीने आता कोर्टासमोर बाजू मांडणे आवश्यक आहे. तरच, या भागातील नागरिकांना न्याय मिळेल. तसेच, ज्यांनी मुख्य रस्त्यावर अनधिकृत बांधकामे, गोडाऊन केली आहेत, त्यांच्याकडून कारवाईचा खर्च व दंड वसूल करणेदेखील अपेक्षित आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही.

हे अंतर अंदाजे दीड कि.मी.; मात्र सकाळी किंवा संध्याकाळी हे अंतर जर तुम्हाला पार करायचे असेल, तर त्यासाठी लागतो दीड तास... होय हे सत्य आहे. या भागातील राजकीय नेत्यांच्या निष्क्रियतेमुळे व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनेक वर्षांपासून या भागातील या रस्त्यावरून प्रवास करणारे हजारो नागरिक हा त्रास सहन करीत आहेत.

सहकारनगर वाहतूक पोलीस पावती फाडण्यासाठीच
या रस्त्यावर सहकारनगर वाहतूक विभागाचे चार-पाच कर्मचारी दिवसभर उभे असतात; मात्र ते येथील वाहतूककोंडी सोडवायची सोडून वरिष्ठांकडून आलेले पावतीचे टार्गेट पूर्ण करण्यामध्ये व्यस्त दिसतात. वाहतूक विभागाने या भागातील वाहतूककोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी व पावती फाडण्यासाठी वेगळे पोलीस नेमावेत, तरच या भागातील वाहतूककोंडी सुटण्यास वाहतूक पोलिसांचा हातभार लागेल.

Web Title:  More construction of illegal constructions, more construction than the rules of court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.