कोंढव्यात पोलीस निरीक्षकांच्या बदली निषेधार्थ मनसेचा मूक मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 08:01 PM2018-10-19T20:01:15+5:302018-10-19T20:12:06+5:30

कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी मिलिंद गायकवाड यांची बदली आमदार योगेश टिळेकर व इतरावर खंडणीचा गुन्हा दाखल केल्यावर अचानकपणे कशासाठी करण्यात आली.

MNS's silent march against police inspectors transfer | कोंढव्यात पोलीस निरीक्षकांच्या बदली निषेधार्थ मनसेचा मूक मोर्चा

कोंढव्यात पोलीस निरीक्षकांच्या बदली निषेधार्थ मनसेचा मूक मोर्चा

ठळक मुद्देमिलिंद गायकवाड यांना निरोप देताना नागरिक व पोलीस कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर कोंढवा पोलिस स्टेशनचे गुन्हे पोलीस निरीक्षकांना निवेदन

कोंढवा : कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांची झालेली तडकाफडकी बदलीच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कोंढवा बुद्रुक येथील माता रमाबाई आंबेडकर अग्निशामक केंद्र ते कोंढवा पोलिस स्टेशनपर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला. गायकवाड यांना निरोप देतानाचा काही नागरिकांना व पोलीस कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
मिलिंद गायकवाड यांची बदली आमदार योगेश टिळेकर व इतरावर खंडणीचा गुन्हा दाखल केल्यावर अचानकपणे कशासाठी करण्यात आली. मिलिंद गायकवाड यांची झालेली बदली सर्वसामान्य बदल्यांचा भाग आहे की यामागे कोणी दबाव टाकला याची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच त्यांची बदली रद्द करावी यांसारख्या मागणीचे निवेदन पुणे महानगर पालिकेतील मनसेचे गटनेते व नगरसेवक वसंत मोरे यांनी कोंढवा पोलिस स्टेशनचे गुन्हे पोलीस निरीक्षकांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. 
 मनसे नगरसेवक साईनाथ बाबर म्हणाले. हडपसर विधानसभा मतदार संघ भयमुक्त झाला पाहिजे. उत्तम कार्य करणारे पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांची झालेली बदली त्वरित रद्द करावी अन्यथा उग्र आंदोलन केले जाईल व ज्याच्या परिणामाला हे बुरे दिनवाले सरकार जबाबदार राहील. मनसेच्या माजी नगरसेविका रुपाली ठोंबरे यांनी सुद्धा गायकवाड यांची बदली रद्द करून पोलीस दलाचे मनोधर्य उंचवावे अशी मागणी यावेळी केली.  
कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी मिलिंद गायकवाड यांनी जवळपास आमदार योगेश टिळेकर यांच्याविरोधात आलेल्या तक्रारीची शहानिशा करून टिळेकर व इतरावर यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला. यानंतर गायकवाड व पोलिस दलावर विविध खालच्या पातळीवरचे आरोप फेसबुक व इतर सोशल मीडियावर केले गेले. 
यामुळे प्रामणिकपणे आपले कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांचे मनोधर्य खच्ची होत आहे. जर हाच पायंडा पडला तर यापुढे अशा स्वरूपाचे गुन्हे यापुढे दाखल करून घेतले जाणार नाही व आरोपी मोकाट फिरत राहतील अशी भीती मोरे यांनी यावेळी व्यक्त केली. 
दिवाळीच्या अगोदर  आमदार योगेश टिळेकर यांचे अजून काही गैरव्यवहार आपण पुराव्याांनिशी जगजाहीर करणार असल्याचे नगरसेवक वसंत मोरे यांनी यावेळी सांगितले.यावेळी मनसे महाराष्ट्र सरचिटणीस हेमंत संभूस, मनसे पुणे शहराध्यक्ष अजय शिंदे, माजी नगरसेविका आरती बाबर, रुपाली ठोंबरे, मनसे विदयार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष साबळे पाटील, प्रशांत कनोजिया, अमोल शिरस, सतीश शिंदे, मंगेश रासकर, विलास कामठे, इतर पक्षातील कार्यकर्ते, महिला व नागरिक उपस्थित होते.

Web Title: MNS's silent march against police inspectors transfer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.