Video: येळकोट येळकोट जय मल्हार! भंडारा खोबऱ्याच्या उधळणीत लाखो भाविक खंडेरायाच्या चरणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 03:12 PM2023-07-17T15:12:16+5:302023-07-17T15:14:18+5:30

अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या तीर्थक्षेत्र जेजुरीत जय मल्हारचा जयघोष

Millions of citizens in jejuri of khandoba yatra because somvati amavasya | Video: येळकोट येळकोट जय मल्हार! भंडारा खोबऱ्याच्या उधळणीत लाखो भाविक खंडेरायाच्या चरणी

Video: येळकोट येळकोट जय मल्हार! भंडारा खोबऱ्याच्या उधळणीत लाखो भाविक खंडेरायाच्या चरणी

googlenewsNext

जेजुरी: अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या तीर्थक्षेत्र जेजुरीत आज सोमवती यात्रेनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली होती. भंडारा खोबऱ्याच्या उधळणीत आणि सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात चार लाखांवर भाविकांनी कुलदैवताचे दर्शन घेतले. काल रविवारी रात्री १० अमावस्या सुरू झाल्यानंतर आज रात्री १२ वाजेपर्यंत अमावस्येच्या पर्वकाळ असल्याने आज जेजुरीत भर सोमवती यात्रा भरली होती. वर्षाकाठी किमान दोनवेळा सोमवारी अमावास्येचा पर्वकाळ येत असतो. सोमवारी उगवत्या सूर्याला अमावस्या असली की त्या दिवशी जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती अमावस्या यात्रा भरते. 

 राज्यभरातून खंडोबाचे नित्य वारकरी, भाविक मोठ्या संख्येने जेजुरीस आले होते.  दुपारी १ वाजता पेशवे, खोमणे, आणि माळवदकर पाटील या मानकऱ्यांच्या उपस्थितीत  खांदेकरी, मानकरी, सेवकांकडून पालखी सोहळा कऱ्हा स्नानासाठी काढण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणावर देवाचा जयघोष आणि भंडार खोबऱ्याची मुक्त हस्ताने भाविकांकडून उधळण होत होती. मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालून बालदारीत देवाच्या उत्सवमूर्ती पालखीत ठेवण्यात आल्या. या अंतर सोहळ्याने कऱ्हा स्नानासाठी गडकोटाबाहेर कूच केले. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास देवाला कऱ्हा नदीवर विधीवत स्नान घालण्यात येणार आहे. त्यानंतर सोहळा माघारीचे प्रस्थान ठेवणार आहे. देवसंस्थांन चे प्रमुख विश्वस्त पोपट खोमणे, विश्वस्त अड् विश्वास पानसे, अड् पांडुरंग थोरवे,  मंगेश घोणे, डॉ. राजेंद्र खेडेकर, अनिल सौन्दडें, अभिजित देवकाते तसेच देवसंस्थांन चे मुख्याधिकारी राजेंद्र जगताप उपस्थित होते.

Web Title: Millions of citizens in jejuri of khandoba yatra because somvati amavasya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.