#MeToo ते #WeToo ने महिला सक्षमीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 01:00 AM2018-10-24T01:00:06+5:302018-10-24T01:00:18+5:30

लोकमत विमेन समिटचे सातवे पर्व पुण्यात शुक्रवारी (२६ आॅक्टोबर) आयोजित करण्यात आले आहे. #MeToo ते #WeToo ‘ती’ची बोलण्याची ताकद या संकल्पनेवर आधारित आहे.

#MeToo to #WeToo Women's Empowerment | #MeToo ते #WeToo ने महिला सक्षमीकरण

#MeToo ते #WeToo ने महिला सक्षमीकरण

पुणे : लोकमत विमेन समिटचे सातवे पर्व पुण्यात शुक्रवारी (२६ आॅक्टोबर) आयोजित करण्यात आले आहे. #MeToo ते #WeToo ‘ती’ची बोलण्याची ताकद या संकल्पनेवर आधारित आहे.
युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, युनिसेफ यांच्या सहयोगाने होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय स्तरावरील उपक्रमात महिलाशक्तीचे प्रतिनिधित्व करण्याºया महिलांचा समावेश होणार आहे. मादागास्करच्या भारतातील राजदूत मेरी लिओन्टाईन रझानाद्रासोवा, प्रेरणा फाउंडेशनच्या संस्थापक पद्मश्री सुधा वर्गिस, प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी, यूएसके फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. उषा काकडे, राष्टÑीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा, तनुश्री दत्ता, शाश्वत विकास व जलव्यवस्थापन तज्ज्ञ रूपाली देशमुख, युनिसेफच्या जेंडर स्पेशालिस्ट अंतरा गांगुली, आशियातील पहिली महिला टॅक्सी संघटना फॉरचीच्या संस्थापक रेवती रॉय आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असेल. विजय दर्डा, चेअरमन, लोकमत अध्यक्षस्थानी असतील.
>लक्ष्मी गौतम, ज्येष्ठ समाजसेविका
विधवांच्या पुनरुत्थानाचे काम अतिशय बिकट परिस्थितीत केले. निराधार विधवांचे अंत्यविधी, महिला सुरक्षा, अवयवदान, बेटी पढाओ-बेटी बचाओ यांसारख्या समाजकार्यात कनकधारा फाउंडेशनच्या वतीने सक्रिय सहभाग. वृंदावनच्या निरक्षर मुलांना प्रगतीकडे घेऊन जाण्यासाठी प्रबोधन आणि अंमलबजावणी करण्यात लक्ष्मी गौतम यांचा मोलाचा वाटा आहे.
>संपत पाल, संस्थापिका, गुलाबी गँग
उत्तर प्रदेशमधील ‘बांडा’ या छोट्याशा खेड्यात कौटुंबिक हिंसाचाराविरोधात आवाज उठवणाºया संपत पाल यांनी स्त्री सबलीकरणासाठी मोठी चळवळ उभारली. ‘गुलाबी गँग’च्या माध्यमातून उभारलेल्या या चळवळीवर एका सिनेमाची निर्मिती केली गेली. महिलांमध्ये क्रांती घडवून आणणाºया या रणरागिणीला तिच्या शब्दांत ऐकण्याची संधी श्रोत्यांना मिळणार आहे.
>जबना चौहान, भारतातील सर्वांत कमी वयाची सरपंच
हिमाचल प्रदेशातील थार्जुन गावातील जबना चौहान ही २२ वर्षांची असताना तिची गावच्या सरपंचपदी नियुक्ती झाली. घरची परिस्थिती हलाखीची असताना तिने आपले शिक्षण पूर्ण केले. तिच्या सरपंचपदाच्या काळात गावच्या आर्थिक, सामाजिक व राजकीय परिस्थितीत कमालीचे बदल घडले.
लोकमत विमेन समिटच्या निमित्ताने आपल्या प्रतिक्रिया ‘लोकमत’च्या अधिकृत ट्विटर हॅँडलवर (@MiLokmat)  व्यक्त करा आणि #LokmatWomenSummitवर टॅग करा.
या परिषदेत सहभागी होण्यासाठी ५ हजार रुपये नोंदणी शुल्क आहे. नोकरदार महिला आणि विद्यार्थिनींना ५० टक्के सवलत आहे. सहभागी होण्यासाठी सहभागासाठी संपर्क करा : 9172109047, Email : rucha.bakre@lokmat.com येथे संपर्क साधावा. प्रवेश फक्त निमंत्रितांसाठी आहे.
लोकमत विमेन समिटच्या निमित्ताने राज्यस्तरीय सखी सन्मान पुरस्कारांचे वितरण या वेळी होणार आहे.

Web Title: #MeToo to #WeToo Women's Empowerment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.