बैलगाडा शर्यतीसंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटणार

By admin | Published: January 25, 2017 11:43 PM2017-01-25T23:43:39+5:302017-01-25T23:43:39+5:30

तमिळनाडूत जशी जलीकट्टूला परवानगी मिळाली तशीच महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींना मिळावी, अशी भूमिका शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी घेतली आहे.

Meet the Chief Minister about the ballad race | बैलगाडा शर्यतीसंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटणार

बैलगाडा शर्यतीसंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटणार

Next

मंचर : तमिळनाडूत जशी जलीकट्टूला परवानगी मिळाली तशीच महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींना मिळावी, अशी भूमिका शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी घेतली आहे. त्यासाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती खासदार आढळराव-पाटील यांनी दिली.
तमिळनाडूच्या धर्तीवर राज्यातही बैलगाडीच्या शर्यतींना पाठिंबा देणार असून, २७ तारखेला मुख्यमंत्र्यांसोबत बजेटवरील चर्चेतही हा मुद्दा मांडू, असे आढळराव-पाटील म्हणाले. यूपीए सरकारने आणि भाजपाने यात रस दाखवला नाही. प्रकाश जावडेकर यांनी तीन वर्षांत काहीही केले नाही. गेली ३ वर्षे मी बैलगाडा शर्यतीबाबत लोकसभेत आवाज उठवला. राज्यपालांच्या वटहुकमाला सुप्रीम कोर्टात आव्हान देता येऊ शकते. अध्यादेशात तरतूद करावी किंवा राष्ट्रपतींद्वारे वटहुकूम काढावा, असे शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी नमूद केल. बैलगाडी शर्यतीवर बंदी असून शर्यतीदरम्यान बैलांवर अत्याचार होतात. त्यांना कू्ररपणे वागवले जात असल्यामुळे केंद्र सरकारने जुलै २०११मध्ये अध्यादेश काढून प्राण्यांच्या शर्यतींवर बंदी घातली.
त्यामुळे बैलगाडीच्या शर्यतीवरील बंदी आली. हा वाद पुढे कार्टात गेला सर्वोच्च न्यायालयाने प्राणीप्रेमींच्या बाजूने निकाल देऊन शर्यतीवर बंदी घातली. मग दोन वर्षांपूर्वी बैलगाडा शर्यतीवरील हायकोर्टाने घातलेली बंदी सुप्रीम कोर्टानेही कायम ठेवली होती. दरम्यान मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर तत्कालीन केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवली होती. राज्यातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवावी, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जावडेकरांकडे केली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने ही बंदी कायम ठेवून सरकारला धक्का दिला. तमिळनाडूत जशी जलीकट्टूला परवानगी मिळाली, तशीच महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींना मिळावी, अशी मागणी आढळराव-पाटील यांनी केली. या संदर्भात शिवसेनेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे त्यांनी नमूद केले. (वार्ताहर)

Web Title: Meet the Chief Minister about the ballad race

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.