पुण्यात अनेकांना आमदारकीची स्वप्ने, भावी आमदार नावाने शक्तिप्रदर्शन सुरु 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 08:23 PM2018-05-10T20:23:09+5:302018-05-10T20:36:06+5:30

पुण्यात अनेकांना आमदारकीची स्वप्न पडण्यास सुरु झाली असून त्यातील काही उत्साही मंडळींनी फ्लेक्स लावत शक्तिप्रदर्शन करण्यास सुरुवात केली आहे.  

many shows interest to become MLA from pune | पुण्यात अनेकांना आमदारकीची स्वप्ने, भावी आमदार नावाने शक्तिप्रदर्शन सुरु 

पुण्यात अनेकांना आमदारकीची स्वप्ने, भावी आमदार नावाने शक्तिप्रदर्शन सुरु 

Next
ठळक मुद्दे पुण्यात अनेकांना दिसू लागली आहे आमदाराची खुर्ची मतदारांना आकर्षित करण्यासाठी कीर्तन सोहळे, मोफत वाहन प्रशिक्षणास प्रारंभ 

 

पुणे :  २०१८चे वर्ष जसजसे मध्यावर आले आहे तसतशा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणूक  झाल्यावर संपूर्ण देशाला लोकसभेचे वेध लागणार आहेत. काही ठिकाणी मुदतपूर्व निवडणुका होणार असल्याची शक्यता जाणकारांनी वर्तवल्यामुळे इच्छुक आत्तापासून जोर लावू बघत आहेत. त्यामुळे पुण्यात अनेकांना आमदारकीची स्वप्न पडण्यास सुरु झाली असून त्यातील काही उत्साही मंडळींनी फ्लेक्स लावत शक्तिप्रदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. 

      २०१४साली झालेल्या निवडणुकीला तीन वर्ष उलटून गेले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीतल्या इच्छूकांनी आपल्या शिडात वारे भरण्यास सुरुवात केली आहे. पुढच्या निवडणुकीत आपला माणूस, भावी आमदार अशा टॅगने चौकाचौकात फ्लेक्स लावले आहेत. एवढेच नाही तर काहींनी याद्या घेऊन टार्गेटही ठरवण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातील काही मतदारसंघांचा भाग महापालिका क्षेत्राबाहेरच्या ग्रामीण भागात येत असल्याने काहींनी ग्रामीण भागात भजन, कीर्तन महोत्सव घेतले आहेत. ग्रामीण भागातील मंदिरात भंडारा आयोजित करण्याचीही चढाओढ लागली आहे.शहरी भागातही अनेकांना दररोज सकाळी शुभसकाळ आणि शुभसंदेश पाठवण्यास सुरुवात केली असून त्यामुळे काहींनी वैतागून या अतिउत्साहींना ब्लॉक केले आहे. 

    उमेदवारी हवी असलेल्यांनी राजकीय वरिष्ठांकडे फेऱ्या मारण्यास सुरुवात केली आहे. इतकेच नव्हे तर अनेकांनी मतदार संघात पक्षाचे मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. मागील निवडणुकीत हरलेले उमेदवार नव्या उमेदीने उभे राहीले असून जागोजागी त्यांनी केलेल्या पोस्टरबाजीमुळे त्यांच्या आशा पल्लवीत झाल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीला कमीतकमी वर्षाचा कालावधी शिल्लक असल्याने अजूनतरी यावर कोणीही भाष्य करायला तयार नाही. मात्र अनेकांनी जोरदार तयारी सुरु करून गुडघ्याला बाशिंग बांधल्याचे पुणेकरांना दिसत आहे. 

Web Title: many shows interest to become MLA from pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.