सामान्यांच्या ‘उडान’ला लॅँडिंग मिळेना, परवडणारी विमानसेवा अजूनही दूरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 01:10 AM2017-10-27T01:10:39+5:302017-10-27T01:13:50+5:30

पुणे : सामान्य नागरिकांना विमानसेवेचा लाभ मिळावा आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढावी यासाठी केंद्र सरकारने एप्रिल २०१७ मध्ये ‘उडान’ (रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम) ही विमानसेवा जाहीर केली.

The luggage 'landing' is likely to be landed, the expensive service is still far away | सामान्यांच्या ‘उडान’ला लॅँडिंग मिळेना, परवडणारी विमानसेवा अजूनही दूरच

सामान्यांच्या ‘उडान’ला लॅँडिंग मिळेना, परवडणारी विमानसेवा अजूनही दूरच

googlenewsNext

श्रीकिशन काळे 
पुणे : सामान्य नागरिकांना विमानसेवेचा लाभ मिळावा आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढावी यासाठी केंद्र सरकारने एप्रिल २०१७ मध्ये ‘उडान’ (रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम) ही विमानसेवा जाहीर केली. परंतु मुंबईमध्ये या सामान्य नागरिकांसाठीच्या ‘उडान’ला लॅँडिंगसाठी जागाच उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे सामान्यांचे कमी दरात ‘उडान’ करण्याचे स्वप्न अजून तरी स्वप्नच राहिले आहे. पुणे-नाशिक-मुंबई या मार्गासाठी विमान उपलब्ध असूनही, त्याला भरारी घेता येत नाही.
सामान्य नागरिकांनी विमानात बसावे, या सेवेत वाढ व्हावी, रोजगार वाढावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘उडान’ या सेवेचे उद्घाटन एप्रिल २०१७मध्ये केले होते. ‘उडान’ म्हणजे ‘उडे देश का आम नागरिक’ अशी त्याची व्याख्या करण्यात आली आहे. देशात सुरुवातीला ४३ ठिकाणी ही सेवा सुरू करण्याची योजना आखण्यात आली. त्यातील काही ठिकाणी ही सेवा सुरू झाली आहे. परंतु, महाराष्टÑात मात्र नांदेड सोडले
तर इतर ठिकाणचे ‘उडान’ अद्याप झालेले नाही.
राज्यातील पुणे, नाशिक (ओझर), जळगाव, कोल्हापूर, सोलापूर येथे ही सेवा सुरू करण्यासाठी एअर डेक्कन या कंपनीला अधिकार देण्यात आलेले आहेत. परंतु, येथून ‘उडान’ करणाºया विमानांना मुंबईत लॅँडिंग करण्यासाठीचे ‘स्लॉट’ म्हणजेच जागा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे हे ‘उडान’ अद्याप ‘हवेत’च आहे. ही सेवा सुरू करण्यासाठी एअर डेक्कन कंपनीला ३० सप्टेंबर २०१७पर्यंतची मुदत देण्यात आली होती; परंतु ती संपली आहे.
दरम्यान, ही सेवा त्वरित सुरू करावी यासाठी, विमान वाहतूक तज्ज्ञ धैर्यशील वंडेकर प्रयत्न करीत आहेत. त्यांनी नवी दिल्ली येथील एअरपोर्ट आॅथॉरिटीचे जनरल मॅनेजर प्रदीप कुमार यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. मुंबईत लॅँडिंगसाठी ‘स्लॉट’ उपलब्ध होत नसल्याचे उत्तर त्यांनी दिले आहे. त्यामुळे लॅँडिंगसाठी जोपर्यंत जागा उपलब्ध होत नाही, तोपर्यंत सामान्यांचे ‘उडान’ अधांतरीच राहणार आहे.
>‘मुंबई-नाशिक-पुणे’ ही सेवा तरी सुरू करावी
मुंबई-नाशिक (ओझर)-पुणे या मार्गावर आता सेवा सुरू करता येऊ शकते. त्यासाठी १८ प्रवासी क्षमता असणारे एम २८ हे विमान
उपलब्ध आहे. परंतु, ही सेवादेखील सुरू करण्यात आलेली नाही. ही सेवा तरी त्वरित सुरू व्हावी, अशी मागणी विमान वाहतूक तज्ज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमधील महानगरपालिकेच्या निवडणुकी वेळी येथील सर्व समस्या सोडवू, असे आश्वासन दिले होते. परंतु, त्यांनी विमानसेवेचे आश्वासन अद्याप पूर्ण केलेले नाही, असेही वंडेकर यांनी सांगितले.
>सवलतीमध्ये
मिळणार तिकीट
सामान्य नागरिकांसाठी ‘रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम’ (आरसीएस) अंतर्गत तिकीटदरात सवलत मिळणार आहे. ‘उडान’च्या सेवेसाठी प्रथम येणाºया ५० टक्के प्रवाशांना ही सवलत मिळेल. उदाहरणार्थ- शंभर प्रवासी क्षमता असणाºया विमानात ५० प्रथम येणाºया प्रवाशांना सवलतीत तिकीट मिळेल.
>गुजरातमध्ये सुरू; महाराष्टÑात का नाही ?
गुजरात राज्यामध्ये भावनगर-अहमदाबाद, दिऊ-अहमदाबाद, जामनगर-अहमदाबाद, मिठापूर (द्वारका)-अहमदाबाद, मुंद्रा-अहमदाबाद या सेवा आॅगस्ट महिन्यातच सुरू झाल्या आहेत. परंतु, महाराष्टÑात मात्र मुदत संपूनही या सेवा सुरू झालेल्या नाहीत, असे धैर्यशील वडेकर यांनी सांगितले.
>आरसीएमअंतर्गत
विमानसेवा दर
मार्ग तिकीट दर
मुंबई-नाशिक-पुणे १,४२०
मुंबई-कोल्हापूर १,९२०
मुंबई-जळगाव २,२५०
मुंबई-सोलापूर २,०८०

Web Title: The luggage 'landing' is likely to be landed, the expensive service is still far away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.