कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर ओक्खी चक्रीवादळात; लक्ष्यद्वीप समुहाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 04:38 PM2017-11-30T16:38:00+5:302017-11-30T16:44:38+5:30

बंगालच्या उपसागरात दक्षिण श्रीलंकाजवळ बुधवारी सकाळी निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर आता ओक्खी चक्रीवादळात झाले आहे़.

The low-pressure stripe converts into an okhi cyclone; Lakshadweep risk | कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर ओक्खी चक्रीवादळात; लक्ष्यद्वीप समुहाला धोका

कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर ओक्खी चक्रीवादळात; लक्ष्यद्वीप समुहाला धोका

Next
ठळक मुद्देदक्षिण केरळ, दक्षिण तामिळनाडु, निकोबार द्वीप समूह येथे जोरदार वृष्टी होण्याची शक्यतामच्छीमारांना पुढील ४८ तास समुद्रात न जाण्याचा इशारा

पुणे : बंगालच्या उपसागरात दक्षिण श्रीलंकाजवळ बुधवारी सकाळी निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर आता ओक्खी चक्रीवादळात झाले असून त्याचा श्रीलंका, लक्ष्यद्वीप समुहाला धोका निर्माण झाला आहे़ यामुळे दक्षिण केरळ, दक्षिण तामिळनाडु, निकोबार द्वीप समूह येथे जोरदार वृष्टी होण्याची शक्यता आहे़ 
सध्या हे चक्रीवादळ कन्याकुमारीपासून १७० किलोमीटर, निकोबार बेटापासून ६०० किलोमीटर दूर असून श्रीलंकेच्या गाले येथून २४० किलोमीटर दूर आहे़ हे चक्रीवादळ येत्या १२ तासात ते पश्चिम उत्तरेच्या दिशेने श्रीलंकेकडे सरकण्याची शक्यता आहे़ हे चक्रीवादळ जस जसे जमिनीकडे येत जाईल तस तशी त्याची तीव्रता वाढत जाण्याची शक्यता आहे़ या चक्रीवादळाचा परिणाम पुढील तीन दिवस दिसून येणार आहे़ 
या चक्रीवादळामुळे दक्षिण केरळ, दक्षिण तामिळनाडु परिसरात पुढील २४ तास ताशी ५५ ते ६५ किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे़ 

 

झाडे कोसळण्याची शक्यता
चक्रीवादळ, पाऊस व वेगाने वाहणारे वारे यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे़ घरे, रस्ते तसेच विद्युत तारा यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे़ त्याचबरोबर पिके, झाडे पडून नुकसान होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़ मच्छीमारांना पुढील ४८ तास समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे़ 

Web Title: The low-pressure stripe converts into an okhi cyclone; Lakshadweep risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.