पीएमपीचा तोटा शंभर कोटींनी घटेल, फे-यांचे नियोजन केल्याने झाली बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 12:52 AM2018-02-09T00:52:42+5:302018-02-09T00:52:46+5:30

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, कुशल व्यवस्थापनासाठी आणलेली सेवा नियमावली, बस मार्गांचे सुसूत्रीकरण आणि फे-यांचे नियोजन अशा विविध उपाययोजनांमुळे पुणे महानगर परिवहन महामंडळाचा (पीएमपी) चालू आर्थिक वर्षाचा तोटा शंभर कोटी रुपयांहून कमी होईल.

The loss of the PMP will be reduced by hundred crores, the cost of saving the fay has been saved | पीएमपीचा तोटा शंभर कोटींनी घटेल, फे-यांचे नियोजन केल्याने झाली बचत

पीएमपीचा तोटा शंभर कोटींनी घटेल, फे-यांचे नियोजन केल्याने झाली बचत

Next

पुणे : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, कुशल व्यवस्थापनासाठी आणलेली सेवा नियमावली, बस मार्गांचे सुसूत्रीकरण आणि फे-यांचे नियोजन अशा विविध उपाययोजनांमुळे पुणे महानगर परिवहन महामंडळाचा (पीएमपी) चालू आर्थिक वर्षाचा तोटा शंभर कोटी रुपयांहून कमी होईल. पीएमपीच्या हितासाठीच हे सर्व निर्णय घेतले आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या हिताला बाधा आली नसल्याचे पीएमपीचे मावळते
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी सांगितले.
राज्य सरकारने मुंढे यांची पीएमपीच्या अध्यक्षपदावरून नाशिकच्या आयुक्तपदी बदली केली आहे. गेल्या दहा महिन्यांच्या कारकिर्दीचा ताळेबंद गुरुवारी त्यांनी पत्रकारांसमोर मांडला. मुंढे यांनी, पीएमपीतील कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच, नाशिक आयुक्तपदाकडे संधी म्हणून पाहत असल्याचे सांगितले.
जानेवारीअखेरीस पीएमपीचा तोटा ८० ते ८५ कोटी रुपये होता. या आर्थिक वर्षअखेरीस तो शंभर कोटी रुपयांच्या पुढे जाणार
नाही. पीएमपी महापालिकेची उप-शाखा नसून ती स्वतंत्र कंपनी आहे. त्यामुळे, कंपनीच्या कार्यपद्धतीनुसार त्याची घडी बसविण्याचा प्रयत्न केला. पीएमपीसाठी स्वतंत्र सेवा नियमावली लागू करण्यात आली असून, बससंख्या वाढली तरी एकाही नव्या कर्मचाºयाची नियुक्ती करण्याची गरज नाही. सध्याच्या ११ हजार कर्मचाºयांमध्ये पीएमपीचे संचलन होऊ शकेल. पीएमपीचे नवे अध्यक्ष त्याची अंमलबजावणी करतील अशी अपेक्षाही, मुंढे यांनी व्यक्त केली. पीएमपीतील पासच्या दरात वाढ झाल्याची टीका करण्यात येत होती. ज्येष्ठ नागरिकांना सर्व ठिकाणी पासमध्ये ५० टक्के सवलत आहे. पीएमपीमध्ये ती ७० टक्के दिली जात होती. त्यामुळे, केवळ सवलत कमी केली, ती बंद केली नाही. कोणत्याही स्वयंसेवी संस्थांच्या मागणीनुसार वैयक्तिक हिताला नाही, तर पीएमपीच्या हितालाच प्राधान्य दिले आहे. एकही निर्णय प्रवासीविरोधी नसल्याचे मुंढे म्हणाले.
>पीएमपी डेपोसाठी वाघोलीत जागा
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) वाघोली येथील दोन जागा पीएमपीला दिल्या असून, त्या एक कोटी रुपये भरून ताब्यात घेण्यात आल्या आहेत. महिनाभरात तेथे डेपो सुरू करता येईल. या जागांसाठी पीएमआरडीएने १६ कोटी रुपयांची मागणी केली आहे. पीएमपी सध्या तोट्यात असल्याने या जागा विनामूल्य उपलब्ध करून देण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांनी जागेच्या किमतीमध्ये सूट देण्यास तत्त्वत: मान्यता दिली आहे. आळंदी येथील राज्य परिवहन महामंडळाचा (एसटी) डेपो केवळ यात्राकाळात वापरला जातो. इतर वेळी तो पीएमपीला वापरण्यास मंजुरी दिल्याचे पीएमपीचे मावळते अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी सांगितले.
>मुंढे ‘हाय- हाय’च्या घोषणा
तुकाराम मुंढे पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या कार्यालयातून बाहेर पडल्यावर काही कामगारांनी ‘मुंढे हाय-हाय’च्या घोषणा दिल्या. याबाबत कर्मचारी संघटनांनी काहीही बोलण्यास नकार दिला. काही कामगारांनी स्वयंस्फूर्तीने या घोषणा दिल्याचे, संघटनेच्या पदाधिकाºयांनी सांगितले.

Web Title: The loss of the PMP will be reduced by hundred crores, the cost of saving the fay has been saved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.