यू ट्यूब पाहून मोटारी चोरणारा जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 01:01 AM2018-08-09T01:01:52+5:302018-08-09T01:01:57+5:30

यू ट्यूबवरील गाडी चोरण्याचा व्हिडीओ पाहून कोल्हापूर येथून आलिशान मोटारी चोरणाऱ्याला पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या गुंडा स्कॉड उत्तर विभागाने पकडले आहे़

Looking at the Youtube car stolen martyr | यू ट्यूब पाहून मोटारी चोरणारा जेरबंद

यू ट्यूब पाहून मोटारी चोरणारा जेरबंद

Next

पुणे : यू ट्यूबवरील गाडी चोरण्याचा व्हिडीओ पाहून कोल्हापूर येथून आलिशान मोटारी चोरणाऱ्याला पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या गुंडा स्कॉड उत्तर विभागाने पकडले आहे़ त्याच्याकडून ३ मोटारी व ५ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
रेवण सोनटक्के (वय २०, रा़ महंमदवाडी, हडपसर) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंडा स्कॉड उत्तर विभागाचे पोलीस निरीक्षक अंजुम बागवान व त्यांचे पथकातील कर्मचारी बुधवारी खडकी परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासत असताना मुळा रोड येथे रस्त्याच्या कडेला एक आलिशान मोटार संशयास्पदरीत्या उभी असल्याचे आढळले. त्या वेळी गाडीत बसलेल्याकडे चौकशी केल्यावर तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला़ त्यामुळे त्याच्याकडे मोटारीची चौकशी केल्यावर ती चोरीची असल्याचे आढळून आले़ अधिक चौकशीत त्याने ही मोटार कोल्हापूर येथील गॅरेजमधून चोरली असल्याचे सांगितले. कोल्हापूर व सांगलीतून २ मोटारी चोरल्याचे कबूल केले. त्याच्याकडून ३ चारचाकी व ५ मोबाईल जप्त केले. ही कारवाई पोलिस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, गणेश पवार, कर्मचारी नरेंद्र सोनवणे, भालचंद्र बोरकर, राजू मचे, धर्मराज आवटे, दीपक भुजबळ व इतर कर्मचारी याच्या पथकाने केली.
>‘गाडी चुराने का तरीका’
रेवण सोनटक्के याने यू ट्यूबवर ‘गाडी चुराने का तरीका’ची व्हिडिओ क्लिप पाहिली होती़ त्यात दाखविल्याप्रमाणे तो चोºया करीत होता़ गाड्या गॅरेजमध्ये दिल्यानंतर मेकॅनिक गाडीची किल्ली गॅरेजमध्ये की-बोर्डवर ठेवत होता. त्या वेळी तेथे गाडी दुरुस्तीच्या बहाण्याने जाऊन तो किल्ली चोरायचा. त्यानंतर रात्री त्या किल्लीच्या मदतीने गाडी चोरून निघून जायचा. त्याने चोरलेल्या गाड्या स्वत: फिरण्यासाठी वापरल्या. तर, आलिशान मोटारीचा वापर त्याने हडपसर-सोलापूर वाहतुकीसाठी केला. अशीच आलिशान मोटार नगर रोडवर शिरूरजवळ अपघात झाल्याने सोडून दिली होती. तर, त्याने यापूर्वी शिवाजीनगर व बस स्थानक परिसरात मोबाईलचोरी केली होती. त्याला आॅगस्ट २०१७मध्ये मोबाईलचोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती़

Web Title: Looking at the Youtube car stolen martyr

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Arrestअटक