शहरातील शाळांवर पोलिसांची करडी नजर

By admin | Published: December 18, 2014 04:28 AM2014-12-18T04:28:55+5:302014-12-18T04:28:55+5:30

पेशावर येथे आर्मी स्कूलवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील प्रमुख शाळांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा पोलीस यंत्रणेकडून घेण्यात येत आहे.

Look at the police in the city's schools | शहरातील शाळांवर पोलिसांची करडी नजर

शहरातील शाळांवर पोलिसांची करडी नजर

Next

पुणे : पेशावर येथे आर्मी स्कूलवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील प्रमुख शाळांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा पोलीस यंत्रणेकडून घेण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुरक्षाव्यवस्थेत वाढ केली असून, सुरक्षेसाठी १५-पॉइंट आराखडा तयार केला आहे. त्यानुसार, शहरात पोलिसांकडून तपासणी मोहीमही सुरू करण्यात आली आहे.
गेल्या दशकभरात पुणे शहर दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर राहिले असल्याचे समोर आले असून, गेल्या पाच वर्षांत तीन दहशतवादी हल्ले झाले आहेत, तर जवळपास दोन डझन दहशतवादी या शहराशी संबंधित आहेत. शहरात नाकाबंदी, वाहन चेकिंग, बोगस सिमकार्ड तपासणी, घरमालक-भाडेकरू तपासणी, लॉज तपासणी अशा प्रकारे कारवाई सुरू आहे. पोलिसांकडून रात्रीच्यावेळी वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Look at the police in the city's schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.