लोकमत पुणे प्रॉपर्टी शोकेसची दिमाखदार सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 03:21 AM2017-10-02T03:21:57+5:302017-10-02T03:22:02+5:30

पुण्यासारख्या स्मार्ट सिटीमध्ये स्वत:चे हक्काचे घर असावे, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. कधी शिक्षणासाठी, कधी नोकरीसाठी, कधी व्यवसायासाठी प्रत्येकावर पुण्यात राहण्याची संधी एकदा तरी येते

Lokmat's Pune Property Showcase celebrated its start | लोकमत पुणे प्रॉपर्टी शोकेसची दिमाखदार सुरुवात

लोकमत पुणे प्रॉपर्टी शोकेसची दिमाखदार सुरुवात

googlenewsNext

पुणे : पुण्यासारख्या स्मार्ट सिटीमध्ये स्वत:चे हक्काचे घर असावे, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. कधी शिक्षणासाठी, कधी नोकरीसाठी, कधी व्यवसायासाठी प्रत्येकावर पुण्यात राहण्याची संधी एकदा तरी येते. पुण्यातील स्वच्छ व समतोल वातावरणामुळे, सुसंस्कृत लोकांमुळे पुण्यात राहायला प्रत्येकाचीच पहिली पसंती असते आणि याचीच प्रचिती आली शनिवारी लोकमत आयोजित ‘पुणे प्रॉपर्टी शोकेस २०१७’ या भव्य गृहप्रदर्शनात.
स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे या गृहप्रदर्शनाची शनिवारी (दि. ३० सप्टेंबर) दिमाखात सुरुवात झाली. या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी क्रेडाई, पुणेचे अध्यक्ष श्रीकांत परांजपे, पुण्याचे पोलीस उपायुक्त (सायबर, आर्थिक गुन्हेशाखा) सुधीर हिरेमठ, सेंट्रल बॅँक आॅफ इंडियाचे फिल्ड जनरल मॅनेजर एस. आर. खटीक आणि सुरेखा अ‍ॅडव्हर्टायझिंगचे सचिन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘लोकमत’चे उप महाव्यवस्थापक (दक्षिण महाराष्टÑ) (जाहिरात) अलोक श्रीवास्तव यांनी स्वागत केले. हे प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ८ यावेळेत सर्व ग्राहकांसाठी खुले राहणार आहे. सोमवार, (दि. २ आॅक्टोबर) प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे. एकाच छताखाली पुणे, पिंपरी-चिंचवड, पुणे जिल्हा अशा संपूर्ण जिल्ह्यातील प्रथितयश व नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे १५० पेक्षा जास्त गृहप्रकल्प या प्रदर्शनात पाहता येणार आहेत. त्यामुळे पहिल्या दिवशी पुणेकरांनी आपल्या स्वप्नातील घर निवडण्यासाठी मोठी गर्दी केली. अनेकांनी दिवाळीच्या शुभमुहूर्तावर गृहप्रवेश करण्याच्या हेतूने दसºयाच्या दिवशी नोंदणी करून हक्काच्या घराचे स्वप्न साकार केले. सदनिका, प्लॉट खरेदीचे अनेक पर्याय असल्याने आपले बजेट, सोयी-सुविधा, अपेक्षांची पूर्तता करणारा गृहप्रकल्प निवडणे सोपे जात आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी भेट दिलेल्या हजारो पुणेकरांनी आनंद व्यक्त केला. दुसºया दिवशी रविवार असल्याने सुट्टीचा सदुपयोग करीत अनेकांनी विविध परिसरातील गृहपर्यायांची माहिती घेत आपल्या नवीन घराची निश्चिती केली. पुण्यामध्ये घरखरेदी करण्यासाठी ग्राहकांसमोर अनेक पर्याय असतात. परंतु, यामध्ये विश्वासार्हतेपासून ते आपल्या आवाक्यातील चांगल्यात चांगला पर्याय निवडण्यात अनेक अडचणी येतात. या सर्व अडचणी ओळखूनच यंदा ‘लोकमत’ने महारेरा अंतर्गतच नोंदविलेल्या गृहप्रकल्पांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. गेल्या ६ वर्षांपासून ‘लोकमत’ प्रॉपर्टी शोकेसच्या माध्यमातून हजारो पुणेकरांना घरासाठी उत्तमातील उत्तम पर्याय मिळाला आहे. त्यांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. या प्रदर्शनात पुणे शहर परिसरातील सर्व भागांत सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती घेणे ग्राहकांना शक्य झाले आहे. वेगवेगळ्या भागांतील आपल्या बजेटमधील घरे पाहता आली.
या प्रदर्शनामध्ये वेळेची तर बचत होतेच शिवाय बांधकाम व्यावसायिक आगामी काळात येणाºया दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनेक भरघोस सूट व फायदे असणाºया अनेक योजनांचा लाभ प्रदर्शनामध्येग्राहकांना होत आहे. यंदाच्या प्रदर्शनामध्ये बजेट होम्स्पासून अगदी लक्झुरिअस होम्स्पर्यंत तर व्यावसायिक जागांपासून ते सध्याच्या युगात सेकंड होमच्या संकल्पनेवर आधारित ओपन बंगलो प्लॉटचे अनेक पर्याय येथे उपलब्ध आहेत. पुण्यातील नेहमीच वाढणाºया व भविष्यात चांगला फायदा मिळवून देणारे प्रॉपर्टीचे अनेक पर्याय या भव्य गृहप्रदर्शनात नागरिकांना पाहता येणार आहेत. प्रदर्शनाच्या दोन्ही दिवशी पुणेकरांनी भरघोस प्रतिसाद देत आपल्या घराची नोंदणी केली.
दसºयाचा मुहूर्त साधून अनेकांनी रजिस्ट्रेशनचीही तयारी केली आहे. या प्रदर्शनाचे बॅँकिंग पार्टनर सेंट्रल बॅँक आॅफ इंडिया असून आऊटडोअर पार्टनर सुरेखा अ‍ॅडव्हर्टायझिंग आहेत.

गृहप्रदर्शनाची वैशिष्ट्ये
महारेराअंतर्गत नोंदवलेले पुण्यातील गृहप्रकल्प.
सेंट्रल बँक आॅफ इंडियाने इच्छुक ग्राहकांचे उत्पन्न विचारात घेऊन ताबडतोब तत्त्वत: गृहकर्ज मंजुरीपत्र त्वरित देण्याची व्यवस्था केली आहे.
१० लाख रु. ते ३ कोटी रु. पर्यंतचे गृहप्रकल्प.
मोफत स्टँप ड्युटी व रजिस्ट्रेशन, योग्य डाऊन पेमेंट, आकर्षक ईएमआय, जीएसटी इतक्या व्याजदराच्या रकमेत सवलत यासारख्या योजना.
पझेशननंतर ईएमआय फेस्टिव्हल आॅफर्स
रेडीपझेशन घरांवर सवलती घराच्या नोंदणीवर रोख रकमेवर सूट, दुचाकीसारखी अनोखी भेट

Web Title: Lokmat's Pune Property Showcase celebrated its start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.