पुण्यातील डॉक्टरांनी दिले विदेशी नागरिकाला जीवनदान 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 08:29 PM2019-04-16T20:29:45+5:302019-04-16T20:30:33+5:30

फिलिपिन्समध्ये त्यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमध्ये महारोहिणीत एक स्टेंट टाकण्यात आला आणि त्यांचे रोजचे जीवन व काम पुर्ववत करण्यात यश आले.

Life donation to a foreigners by Pune doctor | पुण्यातील डॉक्टरांनी दिले विदेशी नागरिकाला जीवनदान 

पुण्यातील डॉक्टरांनी दिले विदेशी नागरिकाला जीवनदान 

googlenewsNext

पुणे : दोन वर्षांपूर्वी घानातील एका 60 वर्षीय नागरिकाला गंभीर हदयरोग झाला होता. त्यांच्या महारोहिणीमध्ये फुगवटा झाल्यामुळे फुटण्याचा धोका बळावला होता. चाचण्यांद्वारे लक्षात आले की टाकलेली स्टेंट ही आपल्या आधीच्या स्थितीतून किंवा जागेतून विस्थापित झाली होती. स्टेंटच्या आधीच्या जागी गळती निर्माण झाली होती. यामुळे मांडीच्या सांध्यातून कॅथेटरद्वारे एंडोव्हॅस्क्युलर अ‍ॅन्युरिझम ही प्रक्रिया करणे सर्वांत प्रभावी उपाय होता. त्यामुळे फुगवटा झालेल्या महारोहिणींमध्ये दोन स्टेंट टाकल्या. पहिली स्टेंट एओरटिक आर्च (चढणा-या व उतरणा-या वाहिन्यांमधील वाकलेल्या स्थितीत असलेली रोहिणी) व दुसरी स्टेंट त्याच्या खाली लावण्यात आली...अशा रितीने यशस्वी शस्त्रक्रिया करून पुण्यातील डॉक्टरांनी या विदेशी नागरिकाला जीवनदान दिले. 
    फिलिपिन्समध्ये त्यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमध्ये महारोहिणीत एक स्टेंट टाकण्यात आला आणि त्यांचे रोजचे जीवन व काम पुर्ववत करण्यात यश आले.मात्र दोन वर्षांनंतर हीच परिस्थिती पुन्हा ओढवली. सतत खोकला येत होता आणि या खोकल्यामुळे काही वेळेस रक्तातील छोट्या गुठळ्या देखील बाहेर यायच्या. छातीत जड वाटू लागल्याने श्वसनाचा त्रास वाढत चालला होता. तेव्हा त्यांनी रूबी हॉल क्लिनिकमधील  डॉक्टरांची भेट घेतली. 
कार्डिओलॉजिस्ट डॉ.सी.एन.मखळे म्हणाले,  रक्ताने भरलेल्या रोहिणी जर फुटल्या तर ही स्थिती जीवघेणी ठरू शकते. एओरटिक डायसेक्शन ही स्थिती सामान्यपणे आढळून येत नाही. दरवर्षी 1 दशलक्ष लोकांपैकी 5 ते 30 लोकं याने ग्रस्त होतात आणि ही स्थिती बहुधा वयस्कर पुरूषांमध्ये आढळते. एओरटिक डायसेक्शन ने ग्रस्त असलेल्या प्रत्येकाला त्रासदायक व अचानक वेदना होतात. इतर लक्षणांमध्ये श्वसनाचा त्रास,बोलण्यात अचानक अडथळा,दृष्टी जाणे,शरीराच्या एका बाजूला अशक्तपणा जाणवणे किंवा पक्षाघात होणे. चालण्यामध्ये त्रास किंवा सतत पाय दुखणे यांचा समावेश आहे.
व्हॅस्क्युलर सर्जन डॉ.धनेश कामेरकर म्हणाले , एओरटिक डायसेक्शन स्थितीचे निदान करण्यासाठी उच्च पातळीवरची अचुकता गरजेची असते, तत्पर निदान हे महत्त्वाचे असते.  ही स्थिती जरी दुर्मिळ असली तरी वेळेवर उपचार न केल्यास यामुळे मृत्युचा धोका बळावतो किंवा मेंदूशी निगडीत आजार देखील होऊ शकतात.
रेडिओलॉजिस्ट डॉ.राहुल सेठ म्हणाले , एओरटिक डायसेक्शन या स्थितीवर उपचारासाठी दोन प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जाऊ शकतात. पहिली म्हणजे पारंपरिक तंत्राद्वारे ओपन हार्ट शस्त्रक्रिया तर दुसरीकडे कमीत कमी छेद असलेली व प्रभावी अशी एंडोव्हॅस्क्युलर शस्त्रक्रिया. एंडोव्हॅस्क्युलर शस्त्रक्रियेमुळे रूग्णाला अनेक फायदे होऊ शकतात. कमीत कमी छेद वापरल्याने रूग्ण लवकर बरा होऊ शकतो,हॉस्पिटलमधील कालावधी अधिक कमी होऊ शकतो,मृत्यू किंवा रोगग्रस्त स्थितीचे प्रमाण कमी होऊ शकते आणि जखमेची खूण राहत नाही.
 

Web Title: Life donation to a foreigners by Pune doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.