कोरेगाव भीमात सर्वधर्मीय आंबेडकर जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 02:10 AM2018-04-16T02:10:31+5:302018-04-16T02:10:31+5:30

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाला घटनेद्वारे मौलिक अधिकार देऊन सर्वांना माणूस म्हणून जगण्याचा नवा अधिकार देत सर्व समजाचा उद्धार केला आहे. आज जगात बाबासाहेबांच्या विचारावर अभ्यास केला जात असल्याने जगात आदर्श घटनाकार म्हणून नावलौकिक आहे.

 Koregaon Bhimate Sadharthramian Ambedkar Jayanti | कोरेगाव भीमात सर्वधर्मीय आंबेडकर जयंती

कोरेगाव भीमात सर्वधर्मीय आंबेडकर जयंती

Next

कोरेगाव भीमा -  विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाला घटनेद्वारे मौलिक अधिकार देऊन सर्वांना माणूस म्हणून जगण्याचा नवा अधिकार देत सर्व समजाचा उद्धार केला आहे. आज जगात बाबासाहेबांच्या विचारावर अभ्यास केला जात असल्याने जगात आदर्श घटनाकार म्हणून नावलौकिक आहे, अशा महामानवाची जयंती सर्वधर्मीयांनी एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी जपत साजरी करण्याचा शिवसेना व ग्रामस्थांचा स्तुत्य उपक्रम असल्याचे पुणे जिल्हा शिवसेनाप्रमुख राम गावडे यांनी सांगितले.
कोरेगाव भीमा येथे शिवसेना व सर्वधर्मीयांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राम गावडे, विठ्ठल ढेरंगे, कैलास सोनवणे, उपजिल्हाप्रमुख अनिल काशिद, बाळासाहेब फडतरे, अशोक गव्हाणे, अशोक गव्हाणे, सरपंच संगीता कांबळे, उपसरपंच वृषाली गव्हाणे, केशव फडतरे, दत्तात्रय ढेरंगे, अरविंद गव्हाणे, राजेंद्र गवदे, कांतीलाल फडतरे, जितेंद्र गव्हाणे, नितीन गव्हाणे, योगेश गव्हाणे, प्रकाश ढेरंगे, सुरेंद्र भांडवलकर, कल्पना गव्हाणे, मालन साळुंखे, आशा काशिद, विवेक ढेरंगे, अमीर इनामदार, राजेश ढेरंगे, भानुदास सरडे, संतोष शिंदे आदी उपस्थित होते. बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमख अनिल काशीद यांनी पुढाकार घेतला होता.
यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस, सहायक पोलीस उपनिरीक्षक अनिल कोळेकर यांच्या उपस्थितीत साजरी केली. मधुकर कंद यांनी सूत्रसंचालन केले तर आभार वृषाली गव्हाणे यांनी मानले.

बाबासाहेबांचे विचार व समानतेचा संदेश जगाने स्वीकारला आहे. रयतेचे राज्य शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले
तर बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून सर्वांना समान अधिकार दिले. काही समाजकंटकांनी धर्म व जातीच्या नावाखाली राजकारण करून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे.
-विठ्ठल ढेरंगे, घोडगंगा साखर कारखाना, माजी संचालक

Web Title:  Koregaon Bhimate Sadharthramian Ambedkar Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.