खंडेरायाही कोट्यधीश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 03:38 AM2018-01-19T03:38:05+5:302018-01-19T03:38:16+5:30

जेजुरीचा खंडेरायाही कोट्यधीशांच्या गणतीत आला आहे. जेजुरी मार्तंड देवसंस्थानच्या नवसनाणे-चांदी सुवर्णालंकाराची मोजदाद पूर्ण झाली असून ६ कोटी ५१ लक्ष ९५ हजार ७७३ रुपये इतकी संपत्ती देवसंस्थानकडे शिल्लक आहे.

Khanderaoyi Kiillionaire | खंडेरायाही कोट्यधीश

खंडेरायाही कोट्यधीश

googlenewsNext

जेजुरी (पुणे) : जेजुरीचा खंडेरायाही कोट्यधीशांच्या गणतीत आला आहे. जेजुरी मार्तंड देवसंस्थानच्या नवसनाणे-चांदी सुवर्णालंकाराची मोजदाद पूर्ण झाली असून ६ कोटी ५१ लक्ष ९५ हजार ७७३ रुपये इतकी संपत्ती देवसंस्थानकडे शिल्लक आहे.
खंडोबा मंदिराचे व्यवस्थापन व भाविकांच्या सोयीसुविधा पाहणाºया श्री मार्तंड देवसंस्थान समितीच्या ताब्यातील भाविकभक्तांनी अर्पण केलेल्या नवसनाणे, सोने, चांदी सुवर्णालंकार, रोख रकमेची १५ जानेवारी २०१८ अखेर मोजदाद करण्यात आली. शहरातील विविध राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये २ कोटी २६ लक्ष ४ हजार ५२२ रुपये शिल्लक आहेत, तर ४ कोटी २५ लक्ष ४९ हजार ३५१ रुपयांच्या मुदत ठेवी आहेत, तसेच भाविकांनी नवसपूर्तीसाठी व पूर्वीचे असलेले देवाचे अलंकार सुमारे ३ किलो ८०४ ग्रॅम वजनाचे सोने आहे. यामध्ये दागदागिने, मुगुट, चैन, अंगठ्या, नाणी, कुंडले, नथ यांचा समावेश आहे. २४५ किलो चांदीचे दागिने, विटा, मुगुट, गाडी, घंगाळे, आदी वस्तू, त्याचबरोबर सुमारे ५१७ किलो वजनाचे पितळ यामध्ये पितळी घंटा, घोडे, तलवार, त्रिशूल, समई व विविध वस्तूंची मोजदाद पूर्ण झाली आहे.

नवसपूर्तीसाठी व पूर्वीचे असलेले देवाचे अलंकार सुमारे ३ किलो ८०४ ग्रॅम वजनाचे सोने आहे. यामध्ये दागदागिने, मुगुट, चैन, अंगठ्या, नाणी, कुंडले, नथ यांचा समावेश आहे.

Web Title: Khanderaoyi Kiillionaire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jejuriजेजुरी