कसब्यात महाविकास आघाडी; आता पुणेकर नवा खासदार म्हणून कोणत्या पक्षाला संधी देणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 02:38 PM2023-05-23T14:38:10+5:302023-05-23T14:38:42+5:30

गिरीश बापट यांच्या रिक्त जागेसाठी होणाऱ्या पुणे लाेकसभा पाेटनिवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात

Kasbayat Mahavikas Aghadi Now which party will Punekar give a chance as a new MP... | कसब्यात महाविकास आघाडी; आता पुणेकर नवा खासदार म्हणून कोणत्या पक्षाला संधी देणार...

कसब्यात महाविकास आघाडी; आता पुणेकर नवा खासदार म्हणून कोणत्या पक्षाला संधी देणार...

googlenewsNext

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघाचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक हाेण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने तयारी केली असून, ती अंतिम टप्प्यात आली आहे. या निवडणुकीसाठी बंगळुरूहून पुण्याला ४,२०० मतदान यंत्रेही दाखल झाली आहेत.

या मतदारसंघात वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा पेठ हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यातील मतदारांची यादी, मतदान यंत्रे, मतदानासाठी आवश्यक साहित्य याबाबत नियोजन करण्यात येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेकडे मतदान साहित्याबाबतची माहिती तातडीने मागवली आहे.

असे आहे नियाेजन 

- एकूण मतदार : १९ लाख ७२ हजार ३७२
- मतदान केंद्रे : दोन हजार
- बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट अशी १२,६०० यंत्रे जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध.
- बंगळुरूहून ४,२०० मतदान यंत्रे प्राप्त झाली असून त्यांची प्राथमिक तपासणी सुरू
- वापरण्यायोग्य यंत्रे, अतिरिक्त आणि पर्यायी यंत्रे, सुरक्षा व्यवस्था कोरेगाव पार्कमधील भारतीय खाद्य गोदामात.
- उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांच्या देखरेखीखाली तपासणी सुरू.

''केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदान साहित्याची माहिती मागविण्यात आली आहे. त्यानुसार माहिती संकलित करण्यात येत आहे. अद्याप पोटनिवडणुकीबाबत कुठलीही सूचना प्राप्त झालेली नाही. परंतु, ४,२०० मतदार यंत्रे प्राप्त झाली आहेत. - भाऊसाहेब गलांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी'' 

Web Title: Kasbayat Mahavikas Aghadi Now which party will Punekar give a chance as a new MP...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.