Kasba By Election | पोटनिवडणुकीच्या मतमोजणीमुळे कोरेगाव पार्क परिसरातील वाहतुकीत बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 09:45 AM2023-03-01T09:45:00+5:302023-03-01T09:45:29+5:30

हा बदल १ मार्च रोजी सकाळी ११ वाजल्यापासून २ मार्च रोजी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत राहणार आहे....

Kasba By Election Traffic changes in Koregaon Park area due to counting of by-elections | Kasba By Election | पोटनिवडणुकीच्या मतमोजणीमुळे कोरेगाव पार्क परिसरातील वाहतुकीत बदल

Kasba By Election | पोटनिवडणुकीच्या मतमोजणीमुळे कोरेगाव पार्क परिसरातील वाहतुकीत बदल

googlenewsNext

पुणे : अन्नधान्य महामंडळाच्या गोदामात गुरुवारी कसबा पोटनिवडणुकीची मतमोजणी होणार असल्याने कोरेगाव पार्क परिसरातील वाहतूक बदल करण्यात आले आहेत. हा बदल १ मार्च रोजी सकाळी ११ वाजल्यापासून २ मार्च रोजी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत राहणार आहे.

सेंट मीरा कॉलेज व अतूर पार्क सोसायटीकडून साउथ मेन रोडकडे येणाऱ्या वाहनांना लेन नं. १ पर्यंत प्रवेश दिला जाईल. लेन नं. १ येथे डावीकडे वळून इच्छितस्थळी जावे. साउथ मेन रोड लेन नं. ५, ६, ७ कडून साउथ मेन रोडवर येणाऱ्या वाहनांना लेन नं. ४ पर्यंत प्रवेश देण्यात येईल, तसेच या भागातील इतर रोडवरून साउथ मेन रोडकडे जाण्यास प्रवेश बंद असणार आहे.

मतमोजणी प्रक्रियेशी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी व उमेदवार, त्याचे प्रतिनिधी व इतरांनी दुचाकी वाहनांचे पार्किंग संत गाडगे महाराज शाळेच्या आवारात पार्क करावीत, असे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.

Web Title: Kasba By Election Traffic changes in Koregaon Park area due to counting of by-elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.