पुणे जिल्ह्यातील मध्यवर्ती सहकारी (पीडीसीसी) बँकेच्या सभासद ९९ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 06:57 PM2018-01-04T18:57:25+5:302018-01-04T19:00:40+5:30

पुणे जिल्ह्यातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (पीडीसीसी) बँकेच्या सभासद ९९ हजार ८०० शेतकऱ्यांना ३११.७३ कोटी रक्कमेचा लाभ देण्यात आला आहे.

karj mafi to 99 thousand farmers by pdcc bank, pune | पुणे जिल्ह्यातील मध्यवर्ती सहकारी (पीडीसीसी) बँकेच्या सभासद ९९ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी

पुणे जिल्ह्यातील मध्यवर्ती सहकारी (पीडीसीसी) बँकेच्या सभासद ९९ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांची माहिती मिळवण्याचे काम सुरूशेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभासाठीची १०४.२५ कोटी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंच्या अंमलबजावणीसाठी देण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार पुणे जिल्ह्यातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (पीडीसीसी) बँकेच्या सभासद ९९ हजार ८०० शेतकऱ्यांना ३११.७३ कोटी रक्कमेचा लाभ देण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांची माहिती मिळवण्याचे काम सुरू आहे.
राज्यातील शेतकरी आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाला छत्रपत्री शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर करणे भाग पडले. मात्र, आॅनलाईन प्रणालीच्या गोंधळामुळे कर्जमाफी योजना राबविण्यात अनेक अडचणी आल्या. परंतु, पुणे जिल्ह्यातील पीडीसीसी बँकेच्या शेतकऱ्यांसाठी ३११.७३ कोटी रक्कम प्राप्त झाली आहे. या रक्कमेपैकी थकबाकीदार शेतकऱ्यांना २०७ कोटी रुपये आणि वेळेवर कर्ज परत करणाऱ्या सभासद शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभासाठीची १०४.२५ कोटी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे. आत्तापर्यंत ३८ हजार ९१५ थकबाकीदार शेतकऱ्यांना २०९.४७ कोटी व ६०. ८८५ शेतकऱ्यांना वर्ग करण्यात आलेली आहे.या व्यतीरिक्त पुनर्गठन केलेल्या १ हजार ३१ शेतकरी सभासदांना ४ कोटी २१ कोटी इतक्या रक्कमेचा लाभ देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील सर्वाधिक ८ हजार ५४४ शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. तर वेल्हा तालुक्यातील केवळ ७१० शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे. 

Web Title: karj mafi to 99 thousand farmers by pdcc bank, pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.