आले रे आले... ‘एसपी’ आले! ‘पुरूषोत्तम’वर ‘स.प.’च्या ‘कृष्णपक्ष’ची मोहोर

By श्रीकिशन काळे | Published: December 29, 2023 08:29 PM2023-12-29T20:29:08+5:302023-12-29T20:29:44+5:30

कोल्हापूरच्या शहाजी लॉ कॉलेजला सर्वोत्कृष्ट प्रायोगिकचा बहुमान

It came, it came... 'SP' came! The seal of 'Krishna Paksha' of 'SP' on 'Purushottam' | आले रे आले... ‘एसपी’ आले! ‘पुरूषोत्तम’वर ‘स.प.’च्या ‘कृष्णपक्ष’ची मोहोर

आले रे आले... ‘एसपी’ आले! ‘पुरूषोत्तम’वर ‘स.प.’च्या ‘कृष्णपक्ष’ची मोहोर

श्रीकिशन काळे, लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: तरूणाईमध्ये अतिशय मानाच्या समजल्या जाणाऱ्या पुरूषोत्तम एकांकिका करंडकावर स. प. महाविद्यालयाच्या ‘कृष्णपक्ष’ने आपली मोहोर उमटवली. तर सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेचा बहुमान कोल्हापूरच्या शहाजी लॉ कॉलेजच्या ‘जंगल जंगल बटा चला है’ ला मिळाला. आव्वाज कुणाचा..?, अंबाबाईच्या नावाने चांगलभलं, आले रे आले एस. पी. आले, जगात भारी कोल्हापुरी अशा घोषणांनी विद्यार्थ्यांनी नाट्यगृह दणाणून सोडले.

महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत स. प. महाविद्यालयाच्या (पुणे) ‘कृष्णपक्ष' एकांकिकेने सांघिक प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. संघास पाच हजार एक रुपयांचे रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान केले. तर सर्वोकृष्ट प्रायोगिक एकांकिका शहाजी लॉ कॉलेजची (कोल्हापूर) ‘जंगल जंगल बटा चला है' ही ठरली. संघास चार हजार एक रुपयांचे रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीप्रत्र दिले.

स्पर्धेचा निकाल आणि पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवारी (दि. २९) आयोजिला होता. पारितोषिक वितरण फिरोदिया करंडक विविध गुणदर्शन स्पर्धेचे प्रमुख सूर्यकांत कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्रीय कलोपासकचे अध्यक्ष अनंत निघोजकर, चिटणीस ॲड. राजेंद्र ठाकूरदेसाई तसेच परिक्षक ज्येष्ठ रंगकर्मी रवींद्र खरे, प्रदीप वैद्य, दिलीप जोगळेकर व्यासपीठावर होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल:

  • सांघिक प्रथम : कृष्णपक्ष (स. प. महाविद्यालय, पुणे).
  • सांघिक द्वितीय : असणं नसणं (देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर)
  • सांघिक तृतीय : निर्झर (महावीर कॉलेज, कोल्हापूर)
  • सर्वोकृष्ट प्रायोगिक एकांकिका : जंगल जंगल बटा चला है (शहाजी लॉ कॉलेज, कोल्हापूर)
  • अभिनय नैपुण्य अभिनेता : (नाव, भूमिका, एकांकिका, महाविद्यालय या क्रमाने) : गंधार जोग (निळा, जंगल जंगल बटा चला है, शहाजी लॉ कॉलेज, कोल्हापूर).
  • अभिनय नैपुण्य अभिनेत्री : (नाव, भूमिका, एकांकिका, महाविद्यालय या क्रमाने) : शिरीन बर्वे (वृंदा, कृष्णपक्ष, स. प. महाविद्यालय, पुणे)
  • सर्वोकृष्ट दिग्दर्शक : गंधार जोग (जंगल जंगल बटा चला है, शहाजी लॉ कॉलेज, कोल्हापूर).
  • सर्वोकृष्ट वाचिक अभिनय नैपुण्य (नाव, भूमिका, एकांकिका, महाविद्यालय) : भारत प्रभुखोत (निर्झर, निर्झर, महावीर कॉलेज, कोल्हापूर)
  • सर्वोकृष्ट वैयक्तिक अभिनय नैपुण्य (नाव, भूमिका, एकांकिका, महाविद्यालय) : पियुष जामदार (अनंता, असणं नसणं, देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर)
  • अभिनय नैपुण्य उत्तेजनार्थ (नाव, भूमिका, एकांकिका, महाविद्यालय) : संपदा भालेराव (आजी, पिक्सल्स, टिळक आयुर्वेद महाविद्यालय, पुणे), आर्या वानखडे (यामिनी, साकव, प्रा. राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड रिसर्च), राज पाटील (अनिरुद्ध जोशी, फेलसेफ, मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड, पुणे), प्रथमेश बाटे (पट्या, बोबड्या, फिनोलेक्स कॉलेज, रत्नागिरी), शांभवी सुतार (सोनी, बोबड्या, फिनोलेक्स कॉलेज, रत्नागिरी), अक्षर ठाकरे (तो, तो पाऊस आणि टाफेटा, प्रताप महाविद्यालय, अमळनेर), क्रांती कांबळे (विद्या, हॅपी फादर्स डे, डी. बी. जे. कॉलेज, चिपळूण), मुकल ढेकळे (फहीम चाचा, रवायत-ए-विरासत, मराठवाडा मित्र मंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय, पुणे), आदित्य चव्हाण (दिग्या, पाहिजे म्हणजे पाहिजे, प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालय, देऊर), आकाश सकपाळ (बाबा, वन पिस, श्री स. ह. केळकर महाविद्यालय, देवगड).

Web Title: It came, it came... 'SP' came! The seal of 'Krishna Paksha' of 'SP' on 'Purushottam'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.