बदलीविरोधात इंदापूरकर एकवटले, नागरिकांची मंत्रालयात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 01:08 AM2018-08-28T01:08:36+5:302018-08-28T01:10:20+5:30

व्यापाऱ्यांनी पाळला अर्धा दिवस बंद : काँग्रेसच्या वतीने तहसीलदार पाटील यांना पाठिंबा

Indapurkar Ektavalay against the transfer, in the Ministry of Civil Affairs | बदलीविरोधात इंदापूरकर एकवटले, नागरिकांची मंत्रालयात धाव

बदलीविरोधात इंदापूरकर एकवटले, नागरिकांची मंत्रालयात धाव

Next

इंदापूर : इंदापूर तालुक्यात मागील ३ दिवसांपासून तहसीलदार श्रीकांत पाटील यांची बदली रद्द करण्यात यावी, यासाठी विविध संघटनांचे आंदोलन सुरू आहे. बदलीविरोधात इंदापूरकर एकवटले आहेत. सोमवार (दि.२७) रोजी इंदापूरमधील व्यापाºयांनी अर्धा दिवस दुकाने बंद ठेवून स्वयंस्फूर्तीने निषेध नोंदवला. परंतु दुपारी १२ वाजता सर्व दुकाने पूर्ववत सुरू झाली.

यावेळी सोमवार ( दि. २७ ) रोजी इंदापूर काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुकाध्यक्ष अ‍ॅड. कृष्णाजी यादव यांनी तहसीलदारांची बदली करण्यासाठी जाहीर पाठिंबा असल्याचे प्रसिद्धी पत्रक काढले आहे. प्रसिद्धी पत्रकानुसार इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांचा ३ वर्षांचा कालावधी पूर्ण होण्याअगोदर २ वर्षांतच बदली केलेली आहे. त्याबाबत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पुणे जिल्हा ग्राहक मंचाचे वतीने सोमवार ( दि. २७) रोजी इंदापूर येथील व्यापारी पेठ बंद करण्याचे आव्हान केले होते. तसेच इतरही इंदापूर तालुक्यातील सामाजिक संस्थांनी इंदापूर बंदचे आव्हान केले होते. तसेच मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे सदरची बदली रद्द होणेबाबत विनंती केलेली आहे. बदलीसाठी विविध व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक, विविध संघटना मागील चार दिवसांपासून इंदापूरमध्ये आंदोलन, उपोषण करून आक्रोश व्यक्त करत असताना, इंदापूर तालुक्याचे आमदार नेमकी कोणती ठोस भूमिका घेणार? अशी लोकांमध्ये चर्चा चालू आहे.

वास्तविक तहसीलदार श्रीकांत पाटील हे इंदापूर येथे रुजू झाल्यापासून त्यांनी सर्वसामान्य व गोरगरिबांची चांगल्या प्रकारची कामे केलेली आहेत. तसेच पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक गावांमध्ये ओढा खोलीकरणाचे काम केलेली आहेत. मात्र, त्यांनी गौण खणिज संपत्तीची चोरी करणाºया माफियांना कायमस्वरूपी चाप बसविलेला आहे. त्यांची राजकीय हेतूने बदली करण्यात आलेली आहे. ती पद्धत पूर्णपणे चुकीची आहे. श्रीकांत पाटील हे एक कर्तव्य दक्ष तहसीलदार आहेत. व सर्वसामन्यांच्या हिताची जपणूक करणारे असल्याने इंदापूर तालुका काँग्रेस कमिटी त्यांची बदली रद्द करणेबाबत अखिल भारतीय ग्राहक पंचायत व इतर सामाजिक संघटनांना जाहीरपणे पाठिंबा देत आहेत. तसेच महसूलमंत्री व पालकमंत्री यांचेकडे इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांची बदली रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

नागरिकांची मंत्रालयात धाव

भिगवण : तहसीलदार श्रीकांत पाटील यांची बदली रद्द करण्यासाठी गावोगावी सह्यांची मोहीम राबली जात आहे. तर काही नागरिकांनी मंत्रालयात धाव घेत मुख्य सचिव डी. के. जैन तसेच महसूल सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांना बदली रद्द करण्याची मागणी करणारे निवेदन दिले आहे. तर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील तसेच पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कार्यालयात निवेदन पोहोचविण्यात आले आहे. त्यामुळे पाटील यांच्या विषयी नागरिकांत मोठ्या प्रमाणावर आपुलकी असल्याचे दिसून येत आहे.

पाटील यांनी गोरगरीब जनतेचे प्रश्न समजून घेत त्याला न्याय मिळावा अशी भूमिका घेतली. जमिनीच्या बांधावर जात दोन शेतकºयांची भांडणे काही समजुतीने, तर काही वेळा करड्या आवाजात मिटविण्याचा प्रयत्न केला. टेबलावर कोणतीही फाईल पडून राहू नये यासाठी जास्तीचा वेळ देत कामाचा निपटारा करीत तालुका संगणकीय दाखल्यासाठी तयार केला. कर्मचाºयांवर वचक बसविला. तालुक्यात वाळूचोरीच्या घटनेत निष्पाप तरुणाचा बळी गेल्याने तर तहसीलदार यांच्या गाडीवर ट्रक घालण्यापर्यंत मजल गेलेल्या वाळू माफियांना वेसण घालत वाळूचोरीला आळा घालण्याचे काम केले. त्यांची कार्यकाळ शिल्लक असताना राजकीय अथवा वाळू माफियाच्या दबावापोटी बदली झाल्याची मानसिकता झाल्याने सर्व सामान्य नागरिकांपासून पोलीस पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पुढारी यांनी बदलीला विरोध करीत कार्यकाळ पूर्ण होत नाही तो पर्यंत बदली करू नये अशी मागणी केली. उपोषण करीत आपला विरोध दर्शविला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवत बदली रद्द करण्याची मागणी केली. तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांना यांना सोबत घेत आखिल भारतीय ग्राहक संघटनेच्या तुषार झेंडेपाटील यांनी मुंबईला मंत्रालयात मुख्य सचिव डी. के. जैन यांची भेट घेत बदली रद्द करण्याचे निवेदन देत बदलीला सामान्य नागरीकातून होत असलेल्या असंतोषाची माहिती जैन यांना दिली. तर प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनाही निवेदन देण्यात आले.

तहसीलदार पाटील यांची बदली रद्द व्हावी, यासाठी मुंबईला मंत्रालयात गेलेल्या कार्यकर्त्यांना मुख्य सचिव डी. के. जैन यांनी वेळ देत उभे राहून निवेदन स्वीकारीत चहापाणी करीत विषयाची माहिती करून घेतली. मात्र महसूल विभागाचे सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी आपल्या खुर्चीवरून न उठताच निवेदन स्वीकाराल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. सामान्य नागरिकाला महसूल विभागाकडून दुय्यम दर्जाची वागणूक मिळत असल्याचे मत या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

Web Title: Indapurkar Ektavalay against the transfer, in the Ministry of Civil Affairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.