पुण्यात 65 ते 75 टक्के प्रदूषणात वाढ ; शास्त्रज्ञ डाॅ. गुफ्रान बेग यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 05:32 PM2019-06-05T17:32:18+5:302019-06-05T17:36:00+5:30

पुण्यातील प्रदूषणात 65 ते 75 टक्के वाढ झाल्याचे मत आयआयटीमएम सफर चे संचालक व शास्‍त्रज्ञ डॉ. गुफ्रान बेग यांनी मांडले

Increase in pollution of 65 to 75 percent in Pune; Scientists Dr. Guffran Beg's opinion | पुण्यात 65 ते 75 टक्के प्रदूषणात वाढ ; शास्त्रज्ञ डाॅ. गुफ्रान बेग यांचे मत

पुण्यात 65 ते 75 टक्के प्रदूषणात वाढ ; शास्त्रज्ञ डाॅ. गुफ्रान बेग यांचे मत

Next

पुणे : वाहतुकीकरण, औद्योगिकरण, व अन्‍य कारणांनी वायू प्रदूषणात वाढ होते. घराबरोबरच औद्योगिकरणामुळे हे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. औद्योगिकरणामुळे कार्बनडाय ऑक्‍साइडच्‍या प्रमाणात मोठी वृध्दी झाली आहे. त्‍यामुळे शरिरातील फुफ्फूस खराब होतात. देशाची राजधानी ही वायू प्रदूषणाची ही राजधानी झाली आहे. त्‍यानंतर अहमदाबादचा नंबर लागतो. तिसऱ्या क्रमांकावर पुणे असून येथे 65 ते 75 टक्‍के प्रदूषण वाढले आहे. असे मत पुण्यातील आयआयटीमएम सफर चे संचालक व शास्‍त्रज्ञ डॉ. गुफ्रान बेग यांनी मांडले. 

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचा स्थापना दिवस व जागतिक पर्यावरण दिन कोथरूड येथील कॅम्‍पसमध्ये साजरा करण्यात आला. पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने युनायटेड नेशन्सने संपूर्ण जगामध्ये “बीट एअर पोल्यूशन्स” ही थीम दिली होती.  त्याच धर्तीवर एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीने स्थापित केलेल्या “एअर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशन” चे उद्घाटन पाहुण्याचे हस्ते करण्यात आले. त्‍याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्‍हणून बोलत होते.  

तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा.राहुल विश्‍वनाथ कराड , कुलगुरू डॉ. एस. परशूरामण , एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे -पाटील आणि एमआयटी डब्‍ल्‍यूपीयूच्‍या पीस स्‍टडी विभागाचे प्रमुख प्रा. मिलिंद पात्रे हे उपस्‍थित होते.

डॉ. गुफ्रान बेग म्‍हणाले, आरोग्‍यपूर्ण जीवन जगण्यासाठी चांगल्‍या ऑक्‍सिजनची आवश्यकता असते. परंतू शहरातील वाढत्‍या वायू प्रदूषणाला आळा घातला नाही तर ते प्रत्‍येकासाठी धोक्‍याची सूचना आहे. चांगल्‍या वायूची गुणवत्ता ही मध्ये  (२.५ पीएम व १० पीएम) आहे. त्‍यासाठी सर्वांना वाढत जाणाऱ्या या प्रदूषणासाठी पाऊले उचलावी लागेल. त्‍यासाठी पेट्रोल व डिझेल वाहनांचा वापर कमी करणे, जनजागृती करणे व जे उपाय शोधले आहे त्‍याचे अनुकरण करावे.  देशातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी अत्‍याधुनिक वाहनांची संख्या वाढवावी, तसेच या संदर्भात जनजागृती ही अत्‍यंत महत्‍वाची आहे.
 

Web Title: Increase in pollution of 65 to 75 percent in Pune; Scientists Dr. Guffran Beg's opinion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.