आडतदारांची अडवणूक; शेतकरी संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 11:52 PM2017-08-13T23:52:14+5:302017-08-13T23:52:46+5:30

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दर रविवारी होणाºया कांदा लिलावप्रक्रियेत अचानक जुन्या आडतदारांनी लिलाव न करण्याचा पवित्रा घेतला.

Inadequate Farmers angry | आडतदारांची अडवणूक; शेतकरी संतप्त

आडतदारांची अडवणूक; शेतकरी संतप्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जुन्नर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दर रविवारी होणाºया कांदा लिलावप्रक्रियेत अचानक जुन्या आडतदारांनी लिलाव न करण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. त्यांनी बाजार समितीच्या कार्यालयात धडक देत जाब विचारला. सभापतींनी मध्यस्थी करीत आश्वासन दिल्यानंतर लिलाव पुन्हा सुरळीत झाला.
या वेळी बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. संजयराव काळे यांनी शेतकरी व आडतदार यांच्याशी चर्चा करून समजूत काढली. सदर गाळेवाटप निर्णय तातडीने स्थगित करून शेतकºयांचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकरी व आडतदार यांच्यात समन्वय साधून हा प्रश्न सोडविण्यात येईल, असे आश्वासन सभापती काळे यांनी शेतकºयांना दिले. याबाबत मंगळवारी बैठक घेण्यात येईल, असे सांगितल्यानंतर लिलाव प्रक्रिया पुन्हा सुरू झाली.
जुन्नर येथील मुख्य कार्यालयाच्या आवारात रविवारी कांद्याचे लिलाव सुरू होते. बाजार समिती प्रशासनाकडून कांदा आडतदार सुशील घोलप यांना कांदा, बटाटा व लसूण ठेवण्यासाठी बाजार समितीच्या आवारातील फूलमार्केट शेडमधील दोन गाळे देण्याचे पत्र आडतदार व बाजार समितीचे संचालक धनेश संचेती यांना देण्यात आले होते. धनेश संचेती यांना आडतदार सुभाष परदेशी यांच्याकडील काढून घेण्यात आलेल्या दोन गाळ्यांचा वापर करण्याचे सांगण्यात आले. मात्र, या निर्णयाला विरोध करीत जुन्या आडतदारांनी अचानक कांदा लिलाव न करण्याचा निर्णय घेतला.
सध्या कांद्याला बाजारभाव असल्याने लिलावासाठी मोठ्याप्रमाणात शेतकरी बाजार समितीत उपस्थितीत होते. लिलाव बंद झाल्याने शेतकरी संतप्त होऊन बाजार समितीच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात धाव घेतली.
बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. संजयराव काळे, उपसभापती दिलीप डुंबरे, संचालक निवृत्ती काळे, प्रकाश ताजणे यांनी आंदोलक शेतकºयांशी या वेळी चर्चा करून समजूत काढली.
बाजार समितीत नुकत्याच झालेल्या सत्तांतरानंतर विद्यमान सभापती संजय काळे व विरोधी गटातील संचालक धनेश संचेती यांच्यातील एकमेकांना शहकाटशह देण्याच्या राजकीय भूमिकेतून सदरचा प्रकार घडला असल्याची चर्चा बाजार समितीत रंगली होती.
बाजार समितीच्या काही संचालकांनी राजकीय हेतूने त्रास देण्याच्या उद्देशातून आम्हा व्यापाºयांना अगोदरच जागेची अडचण असताना इतर आडतदारांना बाजार समितीतील गाळे दिले. याबाबत प्रशासनाने पूर्वकल्पना न देता ऐनवेळेस गाळे देण्याचे पत्र देण्यात आले. या एकतर्फी निर्णयाला विरोध करण्यासाठी आडतदारांनी बाजार समितीला जाब विचारला. त्यामुळे बाजार समितीने या प्रकाराला स्थगिती देऊन यासंदर्भात मंगळवारी बैठकीचे आयोजन केले आहे. - धनेश संचेती, बाजार समिती संचालक व आडतदार व्यापारी
जुन्या आडतदारांची मोनोपॉली
बाजार समितीमध्ये जुन्या आडतदारांनी मोनोपॉली निर्माण केली आहे. नवीन आडतदारांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो. लिलाव बंद करून शेतकºयांना वेठीस धरण्याचा प्रकार योग्य नाही, अशी प्रतिक्रिया कांदा आडतदार सुशील घोलप यांनी व्यक्त केली.

Web Title: Inadequate Farmers angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.