Pune Crime: रागाच्या भरात मुलाने वडिलांच्या डोक्यात गॅसची टाकी टाकून केला खून

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 02:28 PM2023-09-05T14:28:15+5:302023-09-05T14:28:31+5:30

शैला बबन फदाले यांनी घोडेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे...

In a fit of rage, son killed father by throwing gas tank on his head pune latest crime | Pune Crime: रागाच्या भरात मुलाने वडिलांच्या डोक्यात गॅसची टाकी टाकून केला खून

Pune Crime: रागाच्या भरात मुलाने वडिलांच्या डोक्यात गॅसची टाकी टाकून केला खून

googlenewsNext

घोडेगाव (पुणे) : फदालेवाडी येथे रागाच्या भरात मुलाने वडिलांच्या डोक्यात गॅसची टाकी टाकून खून केला. शैला बबन फदाले यांनी घोडेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शरदला दारू पिण्याचे व्यसन होते. त्यामुळे त्याच्यात व वडिलांमध्ये नेहमी वाद होत असत. दि. १ रोजी रात्री शरद फदाले घरी आला. वडिलांनी तुला एवढा उशीर का झाला, तू काही कामधंदा करत नाहीस, असे बोलले. यावरून शरद व वडील बबन यांच्यात वाद झाला. यात शरद याने वडिलांना खाली पाडून जवळील रिकामी गॅसची टाकी बबन फदाले यांच्या छातीवर व कपाळावर मारली.

या मारहाणीमुळे बबन फदाले यांच्या छातीत दुखू लागले म्हणून शिनोली व नंतर पुणे येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. फदाले यांना शरद व आणखी एक मुलगा व दोन मुली आहेत. त्यांनी घडलेला प्रकार मुलगा व मुलींना नंतर सांगितला. उपचारादरम्यान दि. ३ रोजी पूना हॉस्पिटल येथे बबन फदाले यांचा मृत्यू झाला. यानंतर शैला फदाले यांनी घोडेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक किरण भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर वागज करीत आहेत.

Web Title: In a fit of rage, son killed father by throwing gas tank on his head pune latest crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.