अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून मोबाइलमध्ये चित्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 05:42 AM2018-05-16T05:42:55+5:302018-05-16T05:42:55+5:30

पार्लरमध्ये नोकरीचे आमिष दाखवून १६ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या, तसेच त्याचे मोबाइलमध्ये चित्रिकरण करणा-या नराधमाला वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Illustrating in the mobile by torturing a minor girl | अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून मोबाइलमध्ये चित्रण

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून मोबाइलमध्ये चित्रण

वाकड (पुणे) : पार्लरमध्ये नोकरीचे आमिष दाखवून १६ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या, तसेच त्याचे मोबाइलमध्ये चित्रिकरण करणा-या नराधमाला वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सराफत बरकतअली खान (२४, रा. दत्तनगर वाकड, मूळ उत्तर प्रदेश) असे या पार्लर चालकाचे नाव आहे़ पॉस्कोअन्वये गुन्हा दाखल करून सोमवारी रात्री खानला वाकड येथून अटक करण्यात आली. वाकड येथे त्याचे ताज मेकओव्हर युनिसेट सलून जेन्ट्स आणि लेडीज् ब्यूटी पार्लर आहे. पार्लरमध्ये कामावर आलेल्या पीडितेवर पहिल्याच दिवशी खानने अत्याचार केले. तसेच त्याचे मोबाइल चित्रिकरण करीत, ते व्हायरल करण्याची धमकी देत तो दुसºया दिवशीही तिला पार्लरमध्ये बोलावत होता. त्यामुळे मानसिक तणावाखाली आलेली पीडिता दोन दिवसांपूर्वी घरातून बेपत्ता झाली होती़ ती सापडल्यानंतर तिने व तिच्या आई, वडील, बहिणीने घडला प्रकार पोलिसांपुढे कथन केला.

Web Title: Illustrating in the mobile by torturing a minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.