पतीचे बाहेरील महिलांसोबत अनैतिक संबंध; त्रासाला कंटाळून पत्नीने उचलले टोकाचे पाऊल

By नितीश गोवंडे | Published: May 8, 2024 02:58 PM2024-05-08T14:58:13+5:302024-05-08T14:59:01+5:30

पतीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे

Illicit relations of the husband with outside women Fed up with the trouble the wife took the extreme step | पतीचे बाहेरील महिलांसोबत अनैतिक संबंध; त्रासाला कंटाळून पत्नीने उचलले टोकाचे पाऊल

पतीचे बाहेरील महिलांसोबत अनैतिक संबंध; त्रासाला कंटाळून पत्नीने उचलले टोकाचे पाऊल

पुणे : पतीचे बाहेरील महिलांसोबत असलेले अनैतिक संबंध आणि त्याच्याकडून होत असलेल्या सततच्या त्रासाला कंटाळून एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार येरवडा येथील नागपुर चाळीत मंगळवारी (दि. ७) सकाळी साडेपाचच्या सुमारास घडला. मोनिका मधुकर ओव्हाळ (३८) असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे.

याबाबत प्रशांत सुरेश चाबुकस्वार (३१, रा. नागपुर चाळ, येरवडा) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून मधुकर लक्ष्मण ओव्हाळ (४५, रा. नागपुर चाळ) याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मधुकर याचे इतर महिलांसोबत अनैतिक संबंध होते. आरोपी फिर्यादी यांच्या बहिणीला वारंवार मानसिक व शारीरिक त्रास देत होता. पतीच्या त्रासाला वैतागून फिर्यादी यांच्या बहिणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी आरोपी पतीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक आहिरे करत आहेत.

Web Title: Illicit relations of the husband with outside women Fed up with the trouble the wife took the extreme step

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.