भाजपमध्ये कोंडी होण्याइतकी मी लहान नाहीये : पंकजा मुंडे

By राजू हिंगे | Published: September 25, 2023 09:06 PM2023-09-25T21:06:16+5:302023-09-25T21:07:57+5:30

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना युनियन बँकेने सील केला आहे...

I am not too young to cause trouble in BJP: Pankaja Munde pune latest news | भाजपमध्ये कोंडी होण्याइतकी मी लहान नाहीये : पंकजा मुंडे

भाजपमध्ये कोंडी होण्याइतकी मी लहान नाहीये : पंकजा मुंडे

googlenewsNext

पुणे : वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना तोट्यात असल्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे अदा केले. दुष्काळ आणि आर्थिक परिस्थितीमुळे कारखाना चाललाच नाही. आठ-नऊ कारखान्यांचे अहवाल केंद्र सरकारकडे गेले होते. त्यातही माझं नाव होतं; पण मी सोडून इतर सर्व जणांना मदत मंजूर झालीय. ती मदत झाली असती तर कदाचित या सगळ्या घटना घडल्या नसत्या. खरंच माझ्या कारखान्याची अडचण झाली नसती, अशी तीव्र नाराजी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. तसेच भाजपमध्ये कोंडी होण्याइतकी मी लहान नाहीय. मी व्यवस्थित माझ्या संघर्षातून सुंदर मार्ग काढेन, असेही त्यांनी सांगितले.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना युनियन बँकेने सील केला आहे. त्यातच आता या साखर कारखान्याने १९ कोटी रुपयांचा जीएसटी कर बुडवल्याची माहिती समोर आली आहे. जीएसटी विभागाने याप्रकरणी कारखान्याला नोटीस बजावली आहे. त्यानंतर आता या प्रकरणावर पंकजा पुण्यात गणपतींच्या दर्शनासाठी आल्या आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पंकजा म्हणाल्या, ही घटना दोन-तीन महिन्यांपूर्वीही घडली होती. आताही घडली आहे. आमचा त्यांना अतिशय सकारात्मक प्रतिसाद आहे. तो उद्योग पूर्णपणे नुकसानीत आहे. आठ-दहा वर्षे सातत्याने दुष्काळ आल्यामुळे तो कारखाना लिक्विडेशनच्या परिस्थितीत आहे आणि बँकेकडे गहाण आहे. त्यामुळे हे सर्व फॅक्ट्स आहेत. जे आकडे सांगितले जात आहेत, ते व्याजाचे आहेत. चुकीच्या पद्धतीने काहीच झालेलं नाही.

याचं उत्तर मी देऊ शकणार नाही...

भाजपमधून डावललं जातंय का? मदत का केली गेली नाही? असे प्रश्न पंकजा यांना विचारले असता, ‘याचं उत्तर मी देऊ शकणार नाही. मदतीच्या यंत्रणा देऊ शकतात. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा कारखाना आहे. ते ऊसतोड कामगारांचे प्रतिनिधी होते. त्यांनी खूप हलाखीत तो कारखाना उभा केला आणि मी खूप अडचणीत तो कारखाना सुरू ठेवला. तो कारखाना आता बँकेकडे आहे,’ असं त्यांनी सांगितलं.

संघर्षातून सुंदर मार्ग काढेन

‘कारखान्यावर कुणाचं प्रभुत्व आहे, ते महत्त्वाचं नाही; पण कारखान्यावर तिथल्या नागरिकांच्या अर्थव्यवस्था अवलंबून आहे. जर असे हजार युनिट सरकारने चालवले तर खूप लोकांना आधार मिळेल, अशी माझी मागणी होती; पण त्याचं काय झालं, याचं उत्तर मी देऊ शकत नाही,’ असं पंकजा मुंडे म्हणाल्या. तुमची कोंडी होते का? या प्रश्नावर पंकजा मुंडे म्हणाल्या, मी कोंडी होण्याइतकी लहान नाहीय. मी व्यवस्थित माझ्या संघर्षातून सुंदर मार्ग काढेन, असे त्यांनी सांगितले.

Web Title: I am not too young to cause trouble in BJP: Pankaja Munde pune latest news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.