शिक्षणाचे काम अशैक्षणिक कसे? शिक्षकांच्या बहिष्कारावर केसरकरांचा सवाल

By प्रशांत बिडवे | Published: October 16, 2023 06:29 PM2023-10-16T18:29:20+5:302023-10-16T18:30:02+5:30

शिक्षणासाठी असलेले काम अशैक्षणिक असू शकत नसल्याचे मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केले....

How is the work of education non-academic? Kesarkar's question on teachers' boycott | शिक्षणाचे काम अशैक्षणिक कसे? शिक्षकांच्या बहिष्कारावर केसरकरांचा सवाल

शिक्षणाचे काम अशैक्षणिक कसे? शिक्षकांच्या बहिष्कारावर केसरकरांचा सवाल

पुणे : शाळाबाह्य घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणायचे आहे. यामध्ये शाळा हा केंद्रबिंदू असणार आहे. शिक्षक त्यापासून वेगळा हाेउन चालणार नाही. यात शिक्षकांना फार माेठे काम नाही. जाे शाळाबाह्य विद्यार्थी राहिला त्याला आपल्याला शिक्षित करायचे आहे. शिक्षकाने शिकवताना प्रत्येक व्यक्तीला शिकविले पाहिजे. फक्त मुलांना शिकविणे इथपर्यंत ते मर्यादित असू शकत नाही. त्यामुळे शिक्षणासाठी असलेले काम अशैक्षणिक असू शकत नसल्याचे मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.

केसरकर म्हणाले, नवभारत साक्षरता अभियान देशात यशस्वी हाेत असेल तर महाराष्ट्रात का नाही? याचा विचार करावा लागणार आहे. शिक्षक संघटनांचे काही वेगळं मत असेल तर ते आमच्यापर्यंत आणा. शिक्षण अधिकाऱ्यांनी शासन निर्णय काळजीपूर्वक वाचावा आणि त्या संदर्भात शिक्षक संघटनांशी बाेलावे, शिक्षकांशी वैयक्तिक चर्चा करावी.

लवकरच शिक्षक भरतीला सुरूवात -

राज्यात २३ झेडपीचे राेस्टर तपासणी पूर्ण झाली आहे त्यानुसार पद भरतीला सुरूवात केली जाईल. त्यानंतर अनुदानित शाळांमध्ये रीक्त पदेही भरण्यात येणार आहेत. त्यामुळे अनुदानित शाळांनीही राेस्टर तपासणी पूर्ण करून घ्यावी असे शिक्षण विभागाचे सचिव रणजीतसिंह देओल म्हणाले.

फेस रिकग्निशनव्दारे विद्यार्थ्यांची हजेरी

आगामी काळात विद्यार्थ्यांची हजेरीसाठी शाळांमध्ये वेब कॅमेरा लावण्यात येणार आहे. फेस रिकग्नीशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची हजेरी घेतली जाणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचण्यास मदत हाेईल अशी माहिती केसरकर यांनी दिली.

Web Title: How is the work of education non-academic? Kesarkar's question on teachers' boycott

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.